प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटामुळे घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे आकाश ठोसर. या चित्रपटामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली. आज त्याचे असंख्य चाहते आहेत. विशेष करून त्याच्या महिला चाहत्या अधिक आहेत. सध्या आकाश चर्चेत आला आहे कारण त्याच्या आगामी ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाची ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आकाश ठोसर आणि नवा चेहरा सायली पाटील या फ्रेश जोडीचा रोमँटिक अंदाज बघायला मिळणार आहे.

आकाश ठोसर व सायली पाटील नुकतेच लोकमत फिल्मी या कार्यक्रमात चित्रपटाच्याप्रमोशनच्या निमित्ताने आले होते. तेव्हा सायलीला प्रश्न विचारण्यात आला की “आकाश फ्लर्ट करतो का?” त्यावर सायलीने नकारार्थी मान हलवली आणि पुढे म्हणाली “त्याच्याबद्दलची एक तक्रार आहे माझी खरे तर आम्ही अपघाताने मित्र झालो आहोत. झुंड चित्रपटाच्यावेळी मी त्याच्या गाडीचा अपघात केला होता तरीदेखील तो खूप शांत होता.” त्यावर सायलीला विचारण्यात आले की “तू आकाशबरोबर फ्लर्ट करतेस का?” त्यावर तिने नाही असे उत्तर दिले.

सोशल मीडियावर सक्रीय असण्यामागे प्रशांत दामले यांनी सांगितलं कारण; म्हणाले, “समोरच्या प्रेक्षकांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटातलं ‘गुन गुन’ हे नवंकोरं प्रेमगीत व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला प्रेक्षकांच्या भेटीस आलं होतं. आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांनी गायलेल्या या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे तर गाण्याचे बोल वैभव देशमुख यांचे आहेत.

दरम्यान नागराज मंजुळे हे लवकरच ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. येत्या ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.