२०१६ साली प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. याच चित्रपटातून अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरूने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘सैराट’मुळे रिंकू प्रसिद्धीझोतात आली होती. या चित्रपटामुळे तिने यशाचं शिखर गाठलं होतं. तिने साकारलेले आर्ची हे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र या भूमिकेसाठी आधी अनेक मुलींची निवड करण्यात आली होती. याबाबत सायली पाटील या अभिनेत्रीने खुलासा केला आहे.

नागराज मंजुळे लवकरच ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात आकाश ठोसर आणि नवा चेहरा सायली पाटील या फ्रेश जोडीचा रोमँटिक अंदाज बघायला मिळणार आहे. नुकतेच हे दोघे लोकमत फिल्मी या कार्यक्रमात आले होते. तेव्हा सायलीला विचारण्यात आले की “आर्चीच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेण्यात आली होती मात्र ती भूमिका रिंकूने केली तर तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती?” त्यावर सायली म्हणाली, “मी खरं तर अपघाताने अभिनेत्री बनले आहे. मी तेव्हा ऑडिशनसाठीदेखील गेले नव्हते. मी कॉलेजमध्ये असताना मला शॉर्टलिस्ट केलं होतं त्याचपद्धतीने इतर मुलींनादेखील केलं होतं.”

“आकाश ठोसर फ्लर्ट करतो का?” ‘घर बंदूक बिरयानी’ फेम अभिनेत्री म्हणाली…

ती पुढे म्हणाली “माझ्या ४ ते ५ ऑडिशन झाल्यानंतर नागराज सर म्हणाले आता तुझी जवळपास निवड करण्यात आली आहे. पण मी त्यांना म्हणाले मला नाही करायचे. कारण माझ्याकडून तरी असे काही नव्हते ती भूमिका मला करायची आहे. तो विषय तिथेच थांबला त्यानंतर ‘सैराट’ आला आणि मग ४ वर्षानंतर सरांनी मला ‘झुंड’साठी विचारले.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान नागराज मंजुळे हे लवकरच ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. येत्या ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.