‘देवयानी’ ही छोट्या पडद्यावरील मालिका आणि ‘बिग बॉस मराठी’मुळे अभिनेत्री शिवानी सुर्वे प्रसिद्धीझोतात आली. नुकतीच अभिनेत्री स्वप्नील जोशीसह ‘वाळवी’ चित्रपटात झळकली होती. वैयक्तिक आयुष्यात शिवानी सुर्वे गेली अनेक वर्षे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेता अजिंक्य ननावरेला डेट करत आहे.

हेही वाचा : “हास्यजत्रेच्या पहिल्या पर्वाचे…”, सेटवरच्या भिंतीवर गौरव-वनिताने पहिल्या दिवशी नेमकं काय लिहिलं? अभिनेत्रीने केला खुलासा

अलीकडेच शिवानीच्या वाढदिवसानिमित्त अजिंक्य तिला डिनर डेटवर घेऊन गेला होता. शिवानीने तिच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत गोड सरप्राईज दिल्याबद्दल अभिनेत्याचे आभार मानले होते. आता नुकताच शिवानीने अजिंक्यबरोबरचा आणखी एक रोमॅंटिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : “…अन् अमृता खानविलकरने मला खूप शिव्या घातल्या”, प्राजक्ता माळीने सांगितला ‘रानबाजार’ सीरिजचा किस्सा, म्हणाली…

अजिंक्य आणि शिवानीने एकत्र कयाकिंग केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओला अभिनेत्रीने प्रसिद्ध गायक एपी ढिल्लन याचं ‘विथ यू’ हे रोमॅंटिक गाणं लावलं आहे. तसंच अभिनेत्रीने याच्या कॅप्शनमध्ये “तुझ्याबरोबर…” असं लिहितं पुढे हार्ट इमोजी जोडला आहे. नेटकऱ्यांनी शिवानीने शेअर केलेल्या रोमॅंटिक व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : “जवानमध्ये एवढ्या मुली कशाला?”, चाहत्याच्या प्रश्नाला शाहरुख खानने दिलं स्पष्ट उत्तर, सर्वत्र होतंय कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिवानी आणि अजिंक्य दोघांनी ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या लग्नाला घरून संमती मिळाली असली, तरी सध्या दोघंही करिअरवर फोकस करत आहेत. शिवानी शेवटची ‘वाळवी’ या चित्रपटात झळकली होती. लवकरच ती स्वप्नील जोशीसह ‘जिलेबी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच अजिंक्य ननावरे याने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सुभेदार’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.