अभिनेत्री स्पृहा जोशी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनयाबरोबरच उत्तम कवयित्री म्हणून स्पृहा ओळखली जाते. नुकतीच अभिनेत्रीने असोवा या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यानिमित्ताने तिने मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये मांसाहारी पदार्थांवर ताव मारला. तिची ही मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून नेटकरी काहीसे नाराज झाले आहेत.

हेही वाचा : अखेर मल्हारसमोर येणार स्वराज मुलगी असल्याचं सत्य; ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो…

अभिनेता विनोद गायकरसह स्पृहा जोशी एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती. या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये स्पृहा, “खेकडा कसा खावा?” याचं प्रशिक्षण देताना दिसत आहे. “खेकडा खाताना फॅन्सी वागू नये…तो हातानेच खायचा” असं अभिनेत्रीने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. मात्र, स्पृहाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी काहीसे नाराज झाल्याचं कमेंट्स सेक्शनमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : मराठमोळ्या अभिनेत्याने आई-वडिलांना भेट दिली आलिशान गाडी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “ज्यांनी मला घडवलं…”

स्पृहा जोशीचा खेकडा खातानाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. “बाई देवाला तरी घाबर”, “स्पृहा आजपासून तुला अनफॉलो करतोय”, “अरे श्रावण चालू आहे”, “छान छान खाता हो जोशी खेकडा”, “पापा केहेते है बडा नाम करेगी, खेकडा खाके बडा काम करेगी” अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी स्पृहाच्या व्हिडीओवर नाराजी दर्शवली आहे.

हेही वाचा : बेबी बंपचे मॉर्फ फोटो अन् गरोदरपणाच्या चर्चांवर अंकिता लोखंडेने सोडलं मौन; म्हणाली, “या लोकांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, स्पृहा जोशी नुकतीच ‘लोकमान्य’ या मालिकेत दिसली होती. याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या कवितांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकवर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.