‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता ओंकार भोजने प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडल्यानंतर तो झी मराठी वाहिनीवरील ‘फु बाई फु’ या कार्यक्रमात दिसला. मालिकांप्रमाणे तो आता चित्रपटातही दिसत आहे. सध्या तो कलावती चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी, हरिष दुधाणे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत तर ओंकार भोजने, दीप्ती धोत्रे असे कलाकार आहेत. यातीलच दीप्ती धोत्रेने ओंकार भोजनेबद्दलची प्रतिक्रिया दिली आहे.

दिप्ती तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि सुंदर लूकसाठी ओळखली जाते. तिने ‘मुळशी पॅटर्न’, ‘भोंगा’, ‘विजेता’ आणि ‘शेरशिवराज’ यासांरख्या चित्रपटात काम केलं आहे. आता ती ‘कलावती’मध्ये झळकणार आहे. ओंकारबद्दल बोलताना ती असं म्हणाली, “ओंकार एकदम शांत राहणारा माणूस आहे. त्याची चेष्टा केली तरीदेखील तो शांत असतो. तो खूप गोड, नम्र मुलगा आहे. त्याच्याइतका साधा मुलगा मी या इंडस्ट्रीत पहिल्यांदा पाहते आहे.” माध्यमांशी बोलताना तिने प्रतिक्रिया दिली आहे.

सलमान- शाहरुखनंतर आता ‘या’ अभिनेत्रींची जोडी दिसणार गुप्तहेरांच्या भूमिकेत; निर्मात्यांनी दिले संकेत

काही महिन्यांपूर्वी ओंकारने झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला. यामुळे अनेक चाहत्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली होती. ‘हास्यजत्रा’ सोडण्यामागे ओंकारने स्पष्टीकरणदेखील दिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव हे ‘कलावती’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करणार आहेत. तब्बल ४ वर्षांनी संजय जाधव यांचा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.