मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री अचानक परळ येथील केईएम रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. कोणतीही पूर्वकल्पना न देता मुख्यमंत्री केईएम रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी त्यांनी रुग्णालयातील उपचार, सोयी-सुविधांचा आढावा घेतला. शिवाय रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांच्या अचानक भेटीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांचं हे काम पाहून मराठी बिग बॉस फेम अभिनेत्याने त्यांचं कौतुक करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – ‘रॉनी और रानी…’च्या रिमेकमध्ये ३५ वर्षांनी धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या जागी कोणाला घेशील? ‘ही’ नावं घेत करण जोहर म्हणाला…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक करणारा हा बिग बॉस फेम अभिनेता म्हणजे अभिजीत केळकर. अभिजीत हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो प्रत्येक घडामोडींवर आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करत असतो. नुकतीच त्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.

हेही वाचा – ‘या’ फोटोमुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली व निमिषच्या अफेअरच्या चर्चांना आलं होतं उधाण

अभिजीतनं इन्स्टाग्राम स्टोरीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केईएम रुग्णालयाला दिलेल्या अचानक भेटीचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे. आणि लिहिलं आहे की, “इतक्या ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करणारे पहिलेच मुख्यमंत्री.” अभिजीतची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – हार्दिक जोशीला ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका मिळाल्यानंतर पत्नी अक्षयाची काय होती पहिली रिअ‍ॅक्शन? जाणून घ्या

काही दिवसांपूर्वी अभिजीतनं त्याचा लहान मुलगा मल्हारचा स्वयंपाक शिकतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओत अभिजीतचा मुलगा चपाती लाटताना दिसला होता.

हेही वाचा – “माझ्या पदरात…” अभिनेता संतोष जुवेकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाला, “बाप्पा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिजीतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच तो ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिकेतमध्ये झळकला. बालगंधर्वांच्या भूमिकेत तो पाहायला मिळाला होता.