मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मेघना एरंडेला पितृशोक झाला आहे. अभिनेत्रीच्या वडिलांचं २७ फेब्रुवारीला पुण्यात निधन झालं. सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत मेघनाने ही दु:खद बातमी सर्वांना सांगितली.

मेघनाचे वडील सुधीर एरंडे यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. वडिलांबरोबरचा फोटो शेअर करत मेघनाने दु:ख व्यक्त केलं आहे. “मी अत्यंत जड अंत:करणाने आपणा सर्वांना कळवू इच्छिते की, माझे वडील सुधीर एरंडे यांचं २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुण्यात निधन झालं आहे. माझे वडील अतिशय प्रेमळ होते…बाबा तुमची खूप आठवण येईल. ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो! ओम शांती” अशी भावुक पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे.

हेही वाचा : बॉलीवूड गाजवल्यानंतर आता मराठमोळा श्रेयस तळपदे करणार दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण, म्हणाला…

मेघना एरंडेने शेअर केलेल्या पोस्टवर पुष्कर जोग, अभिजीत खांडकेकर, सोनाली कुलकर्णी, सुकन्या मोने या कलाकारांनी कमेंट्स करत तिच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हेही वाचा : “गेल्या ३३ वर्षांत मी कधीच…” कतरिनाबरोबरच्या नात्याबाबत विकी कौशलने पहिल्यांदाच केले भाष्य, म्हणाला, “आता पहिल्यासारखं…”

दरम्यान, मेघना एरंडेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनयाबरोबर ती उत्तम डबिंग आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते. ‘टाईमपास’ चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. डोरेमॉन, शिनचॅन, निंजा हातोडी अशा अनेक लोकप्रिय कार्टुन्सला तिने स्वत:चा आवाज दिला आहे.