अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा खान काल, ३ जानेवारीला लग्नबंधनात अडकली. फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेबरोबर आयराने नोंदणी पद्धतीने लग्न केलं. या लग्नाला देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. तसेच काही मराठी कलाकार देखील आयरा-नुपूरच्या लग्नात पाहायला मिळाले.

आयरा खान-नुपूर शिखरेचं हटके लग्न झालं. नुपूर बनियन व शॉर्ट्सवर घरातून आठ किलोमीटर धावत लग्नस्थळी पोहोचला होता. त्यानंतर त्याने ढोल वाजवला आणि जबरदस्त डान्स केला. यावेळी नुपूरबरोबर डान्स करताना काही मराठी कलाकार पाहायला मिळाले. ‘भाडिपा’ फेम अभिनेता सारंग साठ्ये, सिद्धार्थ मेनन नुपूरबरोबर जबरदस्त डान्स करताना दिसले. तसंच यांच्यासाथीला सारंगची गर्लफ्रेंड पॉला मॅग्लिन होती.

हेही वाचा – Video: “बडे दिल वाला…”, लेकीच्या लग्नातील आमिर खानची ‘ती’ कृती पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक, म्हणाले….

याशिवाय आयरा-नुपूरच्या लग्नाला अभिनेत्री मिथिला पालकर, लोकप्रिय युट्यूबर प्राजक्ता कोळी या दोघी देखील उपस्थित होत्या. या मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर आयरा-नुपूरच्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत; जे चांगलेच चर्चेत आले आहेत.

दरम्यान, नुपूर हा मिथिला पालकरचा फिटनेस ट्रेनर आहे. काही दिवसांपूर्वी मिथिलाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये नुपूर अभिनेत्रीला शीर्षासन करण्यासाठी मदत करताना दिसला होता.

हेही वाचा – Video: “हा नागिन ड्रेस…”, लग्नातील आयरा खानचा लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमिर खानचा जावई हा मराठी आहे. तो पेशाने फिटनेस ट्रेनर आणि डान्सर आहे. Fitnessismची सुरुवात त्याने केली होती. नुपूरला फिटनेस तज्ज्ञ आणि सल्लागार म्हणून ओळखले जाते. आमिर खान, आयराचा तो फिटनेस ट्रेनर होता. याशिवाय त्याने दशकभर सुष्मिता सेनला फिटनेस ट्रेनिंग दिलं आहे.