‘सोनपरी’ म्हणून घरोघरी ओळखल्या जाणाऱ्या मराठी मृणाल कुलकर्णी या वयातही खूप सुंदर दिसतात. त्या नेहमीच आपल्या सिनेमा आणि मालिकांमुळे चर्चेत असतात. अप्रतिम आभिनयासह आपल्या सौंदर्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मृणाल यांनी नुकतीच महाराष्ट्राचा फेवरेट कोण? या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या निमित्ताने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मृणाल यांनी ब्यूटी टीप्स शेअर केल्या आहेत.

मराठीतील सर्वात फॅशनेबल अभिनेत्री कोण, असं विचारल्यावर मृणाल म्हणाल्या, “एकाचं नाव घेणं कठीण जाईल. पण, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर आणि इथे असलेली सायली संजीव. खरंतर आजकाल सगळ्याच अभिनेत्री आपल्या स्टाईलकडे आवर्जून लक्ष देतात.”

हेही वाचा… “मी स्वतःला सिद्ध करून थकलेय,” असे का म्हणाली मराठमोळी मृणाल ठाकूर? जाणून घ्या…

ब्यूटी टीप्सबाबत विचारल्यावर मृणाल म्हणाल्या, “नेहमी खूश राहा, यातच आपलं खरं सौंदर्य आहे.” मेकअपच्या कोणत्या तीन गोष्टी तुम्ही नेहमी स्वत:जवळ ठेवता, या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिलं. “आयलायनर, काजळ आणि लिपस्टिक” या तीन वस्तू कायम मृणाल यांच्याजवळ असतात.

मृणाल कुलकर्णी नेहमीच साधं राहणं पसंत करतात. त्यांना फार मेकअप करायला आवडत नाही. आयलायनर, काजळ, ब्लश, लिपस्टिक इतकेच मेकअप प्रॉडक्ट्स त्या वापरतात. त्यांना साडी नेसायलाही खूप आवडतं.

हेही वाचा… सोनाली कुलकर्णीच्या ‘या’ मल्याळम चित्रपटाने दोन दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टाईलच्या कोणत्या बाबतीत तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आहात असं विचारल्यावर, ‘साडी’ हे एकमेव उत्तर मृणाल यांनी दिलं. “मला साडी नेसायला प्रचंड आवडतं. साडी हा सर्वात सुंदर दिसणारा पोशाख आहे. वैयक्तिक आयुष्यात मी कोणतेही कपडे घालत असले तरी कार्यक्रमांसाठी मला नेहमीच साडी नेसावीशी वाटते,” असं त्या म्हणाल्या.

आजच्या लूकसाठी सून शिवानीची मदत घेतली का? मृणाल यावर हसत म्हणाल्या, “आता एकदम मला एवढी मोठी मुलगी झाली आहे, त्यामुळे ‘मला मुलगी झाली हो’ असं म्हणत ती जे काय म्हणते ते मी मान्य करते.”