शिल्पा तुळसकर ही मराठी अभिनय क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत अनामिका दीक्षित ही मुख्य भूमिका साकारून शिल्पाने प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकतीच ती ‘हाय नन्ना’ या तेलुगू चित्रपटात झळकली. याचेच हिंदी व्हर्जन ‘हाय पापा’ यामध्येही ती होती. या चित्रपटात तिने मृणाल ठाकूरच्या आईची भूमिका साकारली होती.

शिल्पाने तिच्या फेसबुकवर मृणाल ठाकूरबरोबरचा एक फोटो शेअर केला. हा फोटो चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा होता. “तू खूप खास आहेस, तुझ्याबद्दलच्या माझ्या भावना सोशल मीडियावर शेअर करणं अशक्य आहे. मी तुला कधीच कोणाशीही शेअर करणार नाही. पण एक कलाकार म्हणून तुम्ही किती बहरली आहे, हे सर्वांना कळावं अशी माझी इच्छा आहे. तुझा परफॉर्मन्स सहज वाटतो, पण त्यामागची मेहनत मी पाहिली आहे. हे सर्व करताना मी त्याच खोडकर मुलीला भेटले, जिला मी काही वर्षांपूर्वी भेटले होते आणि मी पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात पडले. मृणाल ठाकूर तुला जे हवं ते सगळं मिळो,” असं कॅप्शन शिल्पाने या फोटोला दिलं.

एकाच दाक्षिणात्य चित्रपटात झळकल्या दोन मराठमोळ्या अभिनेत्री! साकारली मायलेकींची भूमिका, कोण आहेत ‘त्या’ दोघी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिल्पाने ही पोस्ट इंग्रजीमध्ये केली होती. या फोटोखाली कमेंटमध्ये एका युजरने ‘केव्हा तरी मराठीत पण व्यक्त हो’ अशी कमेंट केली होती. त्या कमेंटला उत्तर देत शिल्पा म्हणाली, “मी कलाकार आहे, महाराष्ट्राची असल्याचा सार्थ अभिमान आहे पण माझे प्रेक्षक फक्त मराठी नाहीत. महाराष्ट्रीय असल्याचा आनंद आहे, पण मराठी किंवा महाराष्ट्राची या ओळखीपुरती मी स्वत:ला मर्यादित ठेऊ इच्छित नाही. त्यापल्याडच्या चाहत्यांचं प्रेम आणि पाठिंबा मला मिळाला आहे.”

Shilpa Tulaskar
शिल्पा तुळसकरने कमेंटला दिलेलं उत्तर

दरम्यान, मृणाल ठाकूर व शिल्पा तुळसकर यांच्या ‘हाय नन्ना’ चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने सिनेमागृहांमध्ये खूप चांगली कमाई केली. तसेच ओटीटीवरही त्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.