कलाकार मंडळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या दैनंदिन जीवनात येणारे प्रत्येक अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. गेल्या काही दिवसांपासून हायवेवर होणाऱ्या ट्रॅफिक जामविषयी कलाकार मंडळी संताप व्यक्त करत आहेत. आता यासंबंधित लोकप्रिय संगीतकार, गायक, दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – “…म्हणून क्रांती नाव ठेवलं”; अभिनेत्रीनं स्वतः सांगितला यामागचा किस्सा

सलील कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नेहमी चालू घडामोडींवर ते भाष्य करतात. शिवाय आपली परखड मतं ही व्यक्त करत असतात. आता त्यांनी हायवेवर होणाऱ्या ट्रॅफिक जामविषयी इन्स्टाग्रामवर संतप्त स्टोरी शेअर केली आहे.

या स्टोरीमध्ये सलील कुलकर्णींनी लिहिलं आहे की, “एक वेळ बॉलीवूडमध्ये जुनी गाणी रीमिक्स करून वापरणं थांबेल पण हायवेवर ट्रक ड्रायव्हर राईट मोस्ट लेनमधून जाऊन ट्रॅफिक जाम करणं थांबवणार नाहीत.”

हेही वाचा – २००४नंतर पहिल्यांदाच अभिनेत्री सोनाली बेंद्रेला भेटल्यानंतर केदार शिंदेंची होती ‘ही’ रिअ‍ॅक्शन; म्हणाले, “मोठेपणा…”

हेही वाचा – ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ मालिकेनं प्रेक्षकांचा घेतला निरोप; नेटकरी म्हणाले, “फार दुःख…”

दरम्यान, सलील कुलकर्णी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’मध्ये परीक्षक म्हणून काम करत आहेत. तसेच दुसऱ्या बाजूला ‘आयुष्यावर बोलू काही’ला २० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं हा कार्यक्रम पुन्हा सुरू केला आहे. या कार्यक्रमात विशेष म्हणजे फक्त फर्माईशींची मैफिल होतं आहे.

हेही वाचा – “…याचं शल्य मनात नक्कीच आहे”; केदार शिंदेंच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाले, “सैराट….”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलील यांनी ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर गेल्यावर्षी त्यांचा ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सलील यांच्या या देखील चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.