Myra Vaikul Shaky Dance With Mother Watch Video : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत परीची भूमिका साकारणारी लाडकी मायरा आज घराघरांत लोकप्रिय आहे. फक्त मराठीच नव्हे तर हिंदी मालिकेत सुद्धा चिमुकल्या मायराने आपल्या निरागस अभिनयाने प्रत्येकाची मनं जिंकून घेतली आहेत. मालिका, सिनेमे, सोशल मीडिया रिल्स तसेच विविध म्युझिक व्हिडीओमधून मायरा प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
मायरा वयाने लहान असल्याने तिचे सोशल मीडिया अकाऊंट्स तिचे आई-बाबा म्हणजेच श्वेता व गौरव वायकुळ हँडल करतात. नुकताच मायरा व तिची आई श्वेता यांनी मिळून ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स केला, याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. सामान्य लोकांपासून ते बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी संजूच्या या ट्रेंडिंग गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. मायरा व तिची आई या मायलेकींनी साडी नेसून, पारंपरिक लूक करून या ‘शेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
चिमुकली मायरा या पारंपरिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. नारंगी रंगाची साडी नेसून या मायलेकींनी Twinning केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. “माझी आई माझी बेस्ट डान्स पार्टनर आहे” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. नेटकऱ्यांनी या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच कमेंट्समध्ये चिमुकल्या मायराच्या सुंदर एक्स्प्रेशन्सचं भरभरून कौतुक केलंय.
दरम्यान, मायराबद्दल सांगायचं झालं तर, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे तिची लोकप्रियता प्रचंड वाढली. यामध्ये मायराला प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदेबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळाली होती. याशिवाय मायराने ‘नीरजा’ या हिंदी मालिकेत सुद्धा महत्त्वाची भूमिका साकारलीये. तिच्या या दोन्ही मालिकांमधल्या भूमिकांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. याशिवाय ती ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात सुद्धा झळकली आहे.