ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर लवकरच ‘ओले आले’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. दमदार अभिनयाच्या जोरावर नानांनी जवळपास तीन दशकं चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. याचबरोबर ते स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. नुकत्याच झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरांनी त्यांचं बाळासाहेब ठाकरेंशी असलेलं नातं व मातोश्रीशी असलेले संबंध याविषयी भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय कुटुंबांना सुरुवातीपासून एकत्र आणि जवळून पाहिल्यानंतर सद्य राजकीय स्थितीत त्या कुटुंबांचं विभाजन होताना पाहून काय वाटलं? याविषयी सांगताना नाना पाटेकर म्हणाले, “वाईट वाटलं…कारण, बाळासाहेबांमुळे माझं त्या घरातील सगळ्याच मंडळींशी एक छान नातं होतं. बिंदाबरोबर मी ‘अग्निसाक्षी’ नावाचा सिनेमाही केला होता. त्या चित्रपटाची निर्मिती त्याने केली होती. जयदेव, उद्धव, राज या सगळ्यांशी छान नातं होतं. पण, सगळ्यागोष्टी विस्कळीत झाल्या आणि शिवसेना म्हणून मी कोणाकडे पाहायचं असा प्रश्न निर्माण झाला.”

हेही वाचा : ‘मैं तेनू फिर मिलांगी’! कवयित्री अमृता प्रीतम यांचे जोडीदार कवी इमरोज यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

नाना पाटेकर पुढे म्हणाले, “बाळासाहेब मला आवर्जून फोन करून काय रे गाढवा काय करतोय…येऊन जा रे असं सांगायचे. त्यांच्याकडून तो एक फोन येणं हे आमच्यातील नातं होतं. ते गेल्यावर मला कोणाचेही फोन आले नाहीत. राज, उद्धवबरोबर सुद्धा माझं असंच नातं होतं…ते आता बंद झालं. माझा कोणावरही राग नाही त्यांचाही माझ्यावर नसेल. पण, तिकडे मला आता अरे गाढवा येतोस की नाही असं बोलणारं कोणी नाही राहिलं. बाळासाहेब गेले आणि माझा मातोश्रीशी संबंध संपला. आधीसारखं नातं आता नाही राहिलं.”

हेही वाचा : “मी अनेक तेलुगू आणि…”, ‘अ‍ॅनिमल’ मध्ये रणबीर कपूर व रश्मिकाच्या आंतरजातीय लग्नाबद्दल दिग्दर्शकाचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपल्या सगळ्यांच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या राजकारणाचा प्रचंड परिणाम होत असतो. खरंतर आपलं राजकारणाशी काही देणंघेणं नसतं. आपलं मत फक्त पाच वर्षांपुरतं असतं. पाच वर्षांमध्ये एकदा आपलं बोट सवाष्ण होतं…मग संपलं पुढे पाच वर्षांसाठी पुन्हा ते बोट विधवा होतं. एखादी गोष्ट पटली नाही तर सामान्य लोकांना नकाराधिकार वापरण्याचा अधिकार पाहिजे. पण, पाच वर्षांत एकदाच आहे अधिकार मिळतो. त्यामुळे अनेक राजकारण्यांना आज मतदारांची भीती राहिलेली नाही” असं नाना पाटकेर यांनी सांगितलं.