अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तिने भारतीय मुलींना आळशी म्हटलं होतं. मुलींना चांगले पैसे कमावणारा मुलगा पती किंवा बॉयफ्रेंड म्हणून हवा असतो, पण त्या स्वतः मात्र काहीच कमावत नाहीत, असं ती म्हणाली होती. तिच्या या वक्तव्यानंतर काहींनी तिचं समर्थन केलंय, तर काहींनी मात्र तिला ट्रोल केलं आहे. तिचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मुलगा हवाय की मॉलमधील ऑफर?” लग्नासाठी अवाजवी अटी ठेवणाऱ्या मुलींना सोनाली कुलकर्णीने सुनावलं; म्हणाली, “ऐशोआराम पाहिजे तर…”

“भारतातील स्त्रिया आळशी आहेत, असं उच्चवर्णीय महिलाच म्हणू शकते. या देशातील महिलांकडे पाहा. कामाचा योग्य मोबदला न मिळणाऱ्या महिलांना त्या गुन्हेगार असल्यासारखं वाटतं. या देशात महिला कोणत्या परिस्थितीतून जातात याचा सरकारी डेटा तुम्ही वाचायला हवा,” असं एका युजरने म्हटलं आहे.

“यांचं म्हणणं आहे की गृहिणी आळशी असतात, पण नोकरी करणाऱ्या स्त्रिया ज्या आपल्या पती आणि कुटुंबाप्रती कोणतीही जबाबदारी पार पाडत नाहीत त्या आळशी नसतात. पगारी सुट्ट्या नसतानाही जबाबदाऱ्या पार पाडणे हे गृहिणींचे सर्वात कठीण काम आहे,” असं दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे.

हिला फक्त मुलं असल्यानेच ही असं बोलतेय, नाही तर तिने घरातली कामं मुलांनी पण करायला हवी होती, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर सोनालीचं काही जण समर्थन करत आहेत, तर काही जणांना मात्र तिचं हे बोलणं अजिबात पटलेलं नाही. तिच्या विरोधात आणि समर्थनार्थ नेटकरी आपली मतं व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens slam sonali kulkarni over her remark indian girls are lazy hrc
First published on: 17-03-2023 at 11:59 IST