गणेशोत्सवानिमित्त अनेक सेलिब्रिटी लालबागचा राजाच्या दर्शनाला जात आहेत. अशातच आता आणखी एका सेलिब्रिटी व अधिकारी असलेल्या जोडीचा व्हिडीओ समोर आला आहे. अभिनेत्री क्रांती रेडकर आणि अधिकारी समीर वानखेडे हे सतत चर्चेत राहणारं जोडपं होय. क्रांती व समीर दोघांनी गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत.

आदित्य ठाकरेंनी शेअर केले परिणीती चोप्रा-राघव चड्ढांच्या लग्नातील Unseen Photos, लूकने वेधलं लक्ष

व्हिडीओमध्ये पावसात क्रांती व समीर लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताना दिसत आहेत. त्यानंतर ते थेट बाप्पाच्या चरणी नतमस्तक घेऊन आशीर्वाद घेताना दिसतात. त्यांचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर काही पापाराझी अकाउंट्ससह मंडळाकडूनही शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये बाप्पाच्या दर्शनाला जाताना क्रांतीच्या चेहऱ्यावर उत्साह पाहायला मिळत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत ती लालबागचा राजाच्या दर्शनाला पोहोचली.

View this post on Instagram

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, क्रांती रेडकर सध्या ‘ढोलकीच्या तालावर’ या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अधिकारी समीर वानखेडे यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं होतं. तसेच त्यांच्या व क्रांतीच्या लग्नाचे किस्से सांगितले होते.