Pooja Sawant And Siddesh Chavan Wedding : पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा २८ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला. बुधवारी सायंकाळी या जोडप्याने सिनेसृष्टीतील सर्व कलाकार व जवळच्या कुटुंबीयांसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी पूजा आणि सिद्धेशने माध्यमांसमोर जोडीने येऊन हटके उखाणा घेतला. सध्या या जोडप्याने घेतलेल्या भन्नाट उखाण्यांची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

पूजाने लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला लाल रंगाची साडी, हातात हिरवा चुडा, भरजरी दागिने असा लूक केला होता. तर, सिद्धेशने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघेही या इंडोवेस्टर्न लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होते. यावेळी पूजा आणि सिद्धेशने माध्यमांसमोर येऊन लग्न झाल्याचं सांगितलं आणि जोडीने खास उखाणे देखील घेतले.

हेही वाचा : मिस्टर अँड मिसेस कलरफूल! पूजा सावंत अडकली लग्नाच्या बेडीत, थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

“सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, सिद्धेश रावांचं नाव घेते सात जन्मांसाठी!” असा सुंदर उखाणा पूजा सावंतने यावेळी घेतला. तर तिचा नवरा सिद्धेश उखाणा घेत म्हणाला, “ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात जीवनाची नौका, पूजाचं नाव घेतो सर्वजण ऐका!” आम्ही दोघांनीही आधीच उखाणे पाठ करून ठेवल्याचं यावेळी पूजाने सांगितलं.

हेही वाचा : ना पिवळा, ना लाल…; हळदीच्या दागिन्यांसाठी पूजा सावंतने निवडला पांढरा रंग, ‘त्या’ खास गोष्टीने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पूजा सावंतवर आज मराठी कलाविश्वासह तिच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. या दोघांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. पूजाच्या लग्नविधींचे फोटो पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.