Pooja Sawant and Siddhesh Chavan Engagement : ‘दगळी चाळ’ फेम अभिनेत्री पूजा सावंतच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. गेले काही दिवस अभिनेत्री फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात सिद्धेश चव्हाणबरोबर लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात होतं. त्यानुसार आता पूजा आणि सिद्धेशने गुपचूप साखरपुडा उरकला आहे.

साखरपुडा सोहळ्यासाठी अभिनेत्रीने हिरवी पैठणी साडी, नाकात नथ, भरजरी हार असा पारंपरिक लूक पूजाने केला होता. तर, सिद्धेशने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा परिधान केला होता. सोहळ्यादरम्यान दोघांनीही एकत्र मीडियासमोर हजेरी लावत चाहत्यांना सुखद धक्का दिला. पूजा आणि सिद्धेश दोघेही या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होते.

हेही वाचा : “२०१४ पासून फक्त दोन वेळा…”, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला किस्सा; पत्नी व लेकीबद्दल म्हणाले, “आम्ही तिघेही…”

पूजा सावंतने काही दिवसांपूर्वीच रिलेशनशिपची घोषणा करत तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. तेव्हापासून अभिनेत्री केव्हा लग्न करणार? याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण असून तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो.

हेही वाचा : Video : ‘धर्मवीर’ फेम मंगेश देसाईंचा नव्या घरात गृहप्रवेश! मिसेस मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदे यांची खास उपस्थिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पूजा सावंतच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ती ‘मुसाफिरा’ चित्रपटात झळकली होती. यामध्ये पुष्कर जोग, दिशा परदेशी, स्मृती सिन्हा, पुष्कराज चिरपुटकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. आता वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्री लवकरच सिद्धेश चव्हाणबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. तिच्या साखरपुड्याला तिचे जवळचे मित्र वैभव तत्त्ववादी व भूषण प्रधानने देखील हजेरी लावली होती.