मराठी मालिका, वेबसीरिज, चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. श्री श्री रविशंकर यांच्या बंगळूर येथील आश्रमात प्राजक्ता गेली होती. यावेळी तिने श्री श्री रविशंकर यांना लग्न करणं गरजेचंच आहे का? असा प्रश्न विचारला. याचदरम्यानचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
आणखी वाचा – “त्याने मला मारण्याचा…” टीना दत्ताचे शालीन भानोतवर गंभीर आरोप, म्हणाली, “त्याचा खरा चेहरा …”
प्राजक्ताने लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांनी तिला उत्तर दिलं. आता प्राजक्ताने तिचा हाच व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. प्राजक्ता हा व्हिडीओ शेअर करताना म्हणाली, “मला माहित आहे एव्हाना तुम्ही हा व्हिडीओ पाहिला असेल. पण माझ्या गुरुदेवांबरोबरचं पहिलं रेकॉर्ड संभाषण माझ्या प्रोफाइलवर असायलाच हवं ना…”.
“मला त्यांनी दिलेलं उत्तर आवडलं. त्यांचं उत्तर मला पटलं. अखिल भारतीय सिंगल संघटना आपल्याला उत्तर मिळालंय”. प्राजक्ताने हा व्हिडीओ पोस्ट करताच नेटकऱ्यांनी गंमतीशीर कमेंट केल्या आहेत. सिंगल सदा सुखी, याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला लग्न करायचं नाही म्हणून तू हा प्रश्न विचारला आहेस, तू लग्न करणार नाही का? अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
आणखी वाचा – इतके वर्ष जगणार प्राजक्ता माळी, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “मला माहित आहे की…”
“लग्न करणं गरजेचंच आहे का?” या प्राजक्ताच्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांनी अगदी योग्य उत्तर दिलं. ते म्हणाले, “लग्न करणं गरजेचंच आहे का?”. यावर श्री श्री रविशंकर यांनी उत्तर दिलं की, “तू मला विचारत आहेस. असं असतं तर कधीच माझ्या बाजूला अजून एक खुर्ची लागली असती. लग्न केलंच पाहिजे हे काही गरजेचं नाही. खूश राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही लग्न करुन खूश राहा किंवा एकटं खूश राहा. काही लोक लग्न करुनही दुःखी असतात. तसेच एकटं राहिले तरी दुःखीच असतात. तुम्ही निवडा तुम्हाला नेमकं कसं राहायचं आहे. आनंदी राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे”.