‘धर्मवीर २’ या चित्रपटातून नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे प्रसाद ओक हा आहे. नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिका अशा विविध माध्यमांतून प्रसाद ओक प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. आता मात्र त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे तो चर्चेत आहे.

मराठी इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त मानधन प्रसाद ओकला मिळतं का?

काही दिवसांपूर्वीच प्रसाद ओकने ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला असे विचारण्यात आले की, आम्हाला असे समजले आहे की सध्या तू मराठी इंडस्ट्रीमधला सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहेस. त्यावर उत्तर देताना प्रसाद ओकने म्हटले, “हा प्रश्न तुम्ही दोन व्यक्तींना विचारायला हवा. एक तर मंजिरी ओक, कारण तीच माझा सगळा व्यवहार सांभाळते आणि दुसरा मंगेश देसाई, जो ‘धर्मवीर २’चा निर्माता आहे.

“पण, प्रश्नाचं उत्तर देताना मला असं सांगायला आवडेल की मी सगळ्यात जास्त मानधन घेणारा आहे का? यापेक्षा मला सगळ्यात जास्त पाहिलं जातं का, यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. लोकांकडून माझ्याबद्दल सगळ्यात जास्त वाचलं गेलंय का, मी सगळ्यात जास्त वेड लावणारा अभिनेता आहे का, हे पाहण्यामध्ये मला जास्त उत्सुकता आहे.”

आपण जेव्हा श्रीमंत कॅटेगरीमध्ये जातो, तेव्हा घरी प्राणी असणं किंवा ब्लॅक कॉफी पिणं या स्टेटस दाखवणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या आपोआप तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये येत जातात का? कारण टपरीवरचा चहा तितकाच आवडू शकतोच की, तरीसुद्धा ब्लॅक कॉफी मागतो का? असा प्रश्न प्रसाद ओकला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अभिनेत्याने म्हटले, “मी भूक मारण्याकरिता ब्लॅक कॉफी प्यायला लागलो. जेव्हा भूक भागवायला लागतात तेवढे पैसे नव्हते आणि तेवढं अन्न घेण्याची ऐपत नव्हती. कॉफीने भूक मरते. श्रीमंती दाखवण्यासाठी ब्लॅक कॉफी हे आज मी पहिल्यांदा ऐकतोय, हे मला माहितीसुद्धा नाही. मी भूक मारण्यासाठी ब्लॅक कॉफी प्यायला लागलो, सवय लागली, ती आजपर्यंत कायम आहे.”

हेही वाचा: २२ व्या मजल्यावर ३ BHK घर! दिवाळीच्या मुहूर्तावर अमृता खानविलकरचं गृहस्वप्न साकार; दाखवली नव्या घराची पहिली झलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असलेला ‘धर्मवीर २’ हा आता प्रदर्शित झालेला आहे. लवकरच अभिनेता ‘रीलस्टार’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘जिलबी’ अशा चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.