मराठीमधील टॉपच्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये प्रसाद ओकच्या नावाचाही समावेश आहे. प्रसादने रुपेरी पडद्यावर साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षक भरभरुन दाद देताना दिसतात. अभिनयासह दिग्दर्शक म्हणूनही प्रसाद यशस्वी ठरला. त्याने दिग्दर्शन क्षेत्रातही स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं. प्रसादचे फक्त भारतातच नव्हे तर साता समुद्रापलिकडेही चाहते आहेत. याचा त्याला नुकताच अनुभव आला. त्याने सोशल मीडियाद्वारे एक व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

‘महाराष्ट्राची हास्जजत्रा’ या कार्यक्रमामध्ये परीक्षकाच्या खुर्चीत आपण प्रसादला पाहतोच. पण त्याचबरोबरीने सध्या तो त्याच्या आगामी मराठी चित्रपटांच्या तयारीला लागला आहे. सध्या प्रसाद त्याच्या एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये आहे. लंडनमधील काही फोटो व व्हिडीओ त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

आणखी वाचा – “आम्हाला तुंबाड २ आणि ३…” प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता सोहम शाहचं मोठं विधान

प्रसादने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये चाहतेमंडळी त्याच्याबरोबर फोटो काढताना दिसत आहेत. तर प्रसाद चाहत्यांबरोबर बोलतानाही दिसत आहे. परदेशातही आपले चाहते आहेत हे पाहून प्रसादही भारावून गेला. त्याने यादरम्यानचा व्हिडीओ शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीही विविध कमेंट केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

आणखी वाचा – आलिया भट्टनंतर आता सासूबाईंनीही खरेदी आलिशान घर; किंमत जाणून अवाक् व्हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसाद व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “परदेशात जेव्हा आपले चाहते भेटतात तेव्हा लईच भारी वाटतं राव. आपली कलाकृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली आहे. याचं समाधान अवर्णनीय आहे”. या व्हिडीओमध्ये प्रसादच्या चेहऱ्यावर अगदी आनंद दिसत आहे. प्रसाद दादा आम्हाला तुझा अभिमान आहे, खूप भारी, तू खूप उत्तम अभिनेता आहेस अशा विविध कमेंट हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.