scorecardresearch

Premium

Video: ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पडला पार; अभिनेता प्रसाद ओक व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “साहेबांच्या…”

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याला ‘या’ कलाकारांनी लावली हजेरी

prasad oak share video of dharmaveer 2 movie muhurta pravin tarde
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'धर्मवीर २' चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याला 'या' कलाकारांनी लावली हजेरी

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. प्रवीण तरडे दिग्दर्शित हा चित्रपट सर्वाधिक लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवे विक्रमही केले होते. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने उत्कृष्टरित्या निभावली. त्यामुळे प्रसादला सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. आता लवकरच ‘धर्मवीर २’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला.

अभिनेता प्रसाद ओकने नुकताच ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये स्वतः प्रसाद ओकसह दिग्दर्शक प्रवीण तरडे, महेश लिमये, मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी इत्यादी मान्यवर मंडळी पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेता प्रसाद ओकने लिहीलं आहे, “‘धर्मवीर २’ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…”

amitabh-bachchan2
“प्रादेशिक चित्रपट उत्तम पण…” हिंदी चित्रपटसृष्टीची बाजू घेत अमिताभ बच्चन यांनी केली प्रेक्षकांची कानउघडणी
Loksatta lokrang Popular actor Piyush Mishra on the stage of Loksatta Gappa
अभिनय ही गांभीर्यानं करण्याची बाब!
Marathi Actress Sonalee Kulkarni malaikottai vaaliban malayalam movie Mohanlal Lijo Jose Pellissery marathi film industry
मराठमोळ्या अभिनेत्रीचं दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण, अनुभव सांगत म्हणाली, “मराठी व मल्याळम चित्रपटांमध्ये भरपूर…”
hrithik-roshan-anil-kapoor
“गेली चार दशकं…” ‘फायटर’च्या प्रमोशनदरम्यान हृतिकचे वक्तव्य ऐकताच अनिल कपूर यांना अश्रु अनावर

हेही वाचा – Bigg Boss 17: नॉमिनेशन टास्कदरम्यान अंकिता लोखंडे आणि निल भट्टमध्ये कडाक्याचं भांडण, पाहा नवा प्रोमो

प्रसाद ओकने शेअर केलेल्या व्हिडीओवर कलाकार मंडळीसह त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकर, आदिती द्रविड, सुबोध भावे अशा अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 17: बॉलीवूड सेलिब्रिटींचा खास मित्र ओरी बिग बॉसच्या घरातून एका दिवसातच बाहेर, कारण…

दरम्यान, प्रसाद ओकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो येत्या काळात बऱ्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘धर्मवीर २’ व्यतिरिक्त ‘पठ्ठे बापूराव’, ‘जिलबी’, ‘वडापाव’, ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prasad oak share video of dharmaveer 2 movie muhurta pravin tarde pps

First published on: 27-11-2023 at 13:45 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×