मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्यांपैकी प्रशांत दामले हे एक आहेत. आजवर अनेक नाटक, मालिका व चित्रपटांत काम करुन त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या त्याच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख व प्रसाद बर्वे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
प्रशांत दामले सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ‘नियम व अटी लागू’ नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा एक व्हिडीओ त्यांनी फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संकर्षण कऱ्हाडे नाटकाची बस चालवताना दिसत आहे. संकर्षणचा हा व्हिडीओ शेअर करत प्रशांत दामलेंनी खास पोस्ट लिहिली आहे.
हेही वाचा>> भर लाइव्ह इव्हेंटमध्ये गोळीबार, प्रसिद्ध गायिकेला गाणं गात असताना गोळी लागली अन्…; नेमकं काय घडलं?
“काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण ह्याला बरं वाटेनासं झालं. साधारणपणे, प्रयोग १२:३०वाजका संपल्यावर आम्ही सेट भरून, जेवून पहाटे २ वाजताच्या सुमारास मुंबईकडे निघालो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळचं थांबलं. पण थांबेल तो संक्या कसला. त्याने चालकाला मागे झोपवलं आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडे हेवीचा पण लायसन आहे हे कालच मला कळले. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला. इसको बोलता हैं जिगर नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीड ने चालू आहेत,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
प्रशांत दामलेंच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी शेअर केलेला संकर्षणचा बस चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant damle shared sankarshan karhade bus driving video viral kak