‘दोस्त दोस्त ना रहा’ असं म्हणत अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब या दोन जिवलग मित्रांच्या नात्यात सध्या दुरावा निर्माण झाला आहे. प्रत्येकजण कधी ना कधी हा प्रेमात पडतोच. आपल्या मित्राला त्याचं प्रेम मिळावं यासाठी जीवाचं रान करणारे मित्र आपण पाहिले आहेत. मात्र अभिनयला त्याच प्रेम मिळू नये यासाठी चक्क प्रथमेशने खोडा घातला आहे.

आणखी वाचा : “तू लग्न कधी करत आहेस?” अखेर प्राजक्ता गायकवाडने दिलं उत्तर, म्हणाली…

savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

असं कोणतं कारण आहे की, अभिनयच्या प्रेमाच्या आड प्रथमेश येत असेल? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. अभिनय आणि प्रथमेश हे दोघेही ‘सिंगल’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. हा एक धमाल चित्रपट असून एक मित्र प्रेमाच्या बाजूने, तर दुसरा मित्र प्रेमाच्या विरोधात काय काय करामती करतो याची गंमत पहायला मिळणार आहे. एका मुलीसाठी दोस्तीत कुस्ती होईल की प्रेम जिंकेल यावर भाष्य करणारा ‘सिंगल’ हा चित्रपट प्रेक्षकांच फूल टू मनोरंजन करेल असा विश्वास अभिनय आणि प्रथमेश व्यक्त करतात. या दोघांसोबत या चित्रपटात रमेश परदेशी, प्राजक्ता गायकवाड, राजेश्वरी खरात, सुरेश विश्वकर्मा आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

हेही वाचा : “मला भेट असे मेसेज एक मुलगा सतत करायचा आणि…,” रितिका श्रोत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा

दिग्दर्शक चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी ‘सिंगल’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. किरण काशिनाथ कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, शरद पाटील, अमोल कागणे, गौरी सागर पाठक, ‘सिंगल’ हे या चित्रपटाचे निर्माते असून सह-निर्माते सुमित कदम आहेत. चित्रपटाचं लेखन सतीश समुद्रे यांचे असून पटकथा चेतन चावडा, सागर पाठक आणि सतीश समुद्रे यांची आहे. अभिजीत कवठाळकर, मोहित कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.