प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर यांचा लग्नसोहळा फेब्रुवारी महिन्याच्या २४ तारखेला थाटामाटात पार पडला. जानेवारी महिन्यात एकत्र केळवणाचा फोटो शेअर करत या जोडप्याने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. यानुसार प्रथमेश-क्षितिजाचा १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी साखरपुडा, तर २४ तारखेला लग्नसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाला सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

प्रथमेश आणि क्षितिजाचा साखरपुडा होऊन आज ( १४ मार्च ) एक महिना पूर्ण झाला आहे. त्यामुळे या खास दिवशी या दोघांनी त्यांच्या लग्नसोहळ्यातील एक खास Unseen व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये दोघांच्या साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंत सगळ्या पारंपरिक विधींची झलक पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “करिअरसाठी पत्नीला सोडून देता…”, जेव्हा शाहरुख खानने सिनेसृष्टीतील अभिनेत्यांवर केलेली टीका; म्हणालेला, “एवढे मूर्ख…”

प्रथमेश-क्षितिजाच्या लग्नाला दिग्दर्शक रवी जाधव, सिद्धार्थ जाधव हे देखील उपस्थित राहिले होते. लग्नातील प्रत्येक विधीसाठी अभिनेत्याने खास लूक केला होता. प्रथमेशच्या हळदीला सगळ्यांनी एकच जल्लोष केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय क्षितिजा सुद्धा साखरपुडा असो किंवा हळद प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसत होती. या संपूर्ण व्हिडीओला प्रथमेशच्या गाजलेल्या ‘टाईमपास’ चित्रपटाची सदाबदार गाणी जोडण्यात आली आहे.

हेही वाचा : Video : “थंड बर्फ कोणाला द्याल?” अजित पवारांनी घेतलं कुटुंबातील ‘या’ व्यक्तीचं नाव, म्हणाले…

प्रथमेश परबने या व्हिडीओला खूपच खास नाव दिलं आहे. प्रथमेश आणि क्षितिजा या जोडीला त्यांचे चाहते प्रेमाने ‘प्रतिजा’ असं म्हणतात. त्यामुळे या व्हिडीओला सुद्धा अभिनेत्याने ‘प्रतिजा’ असं नाव दिलेलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुझ्यामुळे प्रत्येक दिवस मला स्वप्नवत वाचतो. लग्नानंतर खऱ्या अर्थाने माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. आज एक महिना पूर्ण झाल्याबद्दल क्षितिजा तुला भरभरू प्रेम” असं कॅप्शन प्रथमेशने या व्हिडीओला दिलं आहे. दरम्यान, सध्या चाहत्यांसह नेटकरी प्रथमेश-क्षितिजाच्या लग्नसोहळ्यातील व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.