Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Engagement: ‘मला वेड लागले प्रेमाचे…’ म्हणत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला प्रथमेश परब आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. १४ फेब्रुवारीला व्हेलेंटाईन डे दिवशी प्रथमेशचा क्षितिजा घोसाळकरबरोबर साखरपुडा पार पडला. पारंपरिक पद्धतीत मोठ्या थाटामाटात दोघांचा साखरपुडा झाला. याचे फोटो व व्हिडीओ अजूनही चर्चेत आहेत.

प्रथमेश परबच्या साखरपुड्यातील एका व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेश भाऊ प्रतिक परबबरोबर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ Akshata Banquet या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – आदित्य नारायणने कॉन्सर्टमध्ये फोन फेकलेल्या चाहत्याला मिळाला नवा मोबाइल, गायकाने नाहीतर ‘यांनी’ दिला भेट…

या व्हिडीओमध्ये प्रथमेश व प्रतिक अमिताभ बच्चन व गोविंदा यांच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर डान्स करताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर प्रथमेश व त्याची होणारी बायको क्षितिजाने प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, प्रथमेश व क्षितिजाच्या लग्नाला अवघे काही दिवस बाकी आहेत. २४ फेब्रुवारीला दोघं सात फेरे घेऊन नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. त्यामुळे सध्या दोघं लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत. साखरपुडा झाल्यानंतर प्रथमेश सासूरवाडीला गेला आहे. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.

हेही वाचा – “मुजरा फक्त महाराजांना”, शिवजयंतीच्या शुभेच्छा देत रुचिरा जाधवने ‘बिग बॉस’च्या घरातील सांगितला एक प्रसंग, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रथमेश-क्षितिजाचा प्रेमविवाह आहे. इन्टाग्रामवर दोघांची पहिली ओळख झाली. त्यानंतर इन्स्टाग्रामवर गप्पा मारत-मारत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘टाइमपास ३’च्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितिजा भेटले. यानंतर दोघांची मैत्री आणखी दृढ झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यामुळे आता दोघांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला.