‘टाईमपास’ फेम प्रथमेश परबचा साखरपुडा १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पार पडला. दोघांच्या साखरपुड्यातील बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. येत्या २४ तारखेला प्रथमेश आणि क्षितिजा विवाहबंधनात अडकणार आहेत. अभिनेत्याने जानेवारी महिन्यात केळवणाचे फोटो शेअर करत साखरपुडा व कालांतराने लग्नाची तारीख जाहीर केली होती.

साखरपुडा सोहळा पार पडल्यानंतर प्रथमेश व क्षितिजा दोघेही जोडीने कोकणातील श्रीवर्धन येथे पोहोचले आहेत. याठिकाणी क्षितिजाचं गाव आहे. साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच गावी गेलेल्या जावयाचं घोसाळकरांनी जोरदार स्वागत केल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : ‘दंगल’ फेम सुहानी भटनागरचं निधन, वडिलांनी दिली दुर्मिळ आजाराची माहिती; म्हणाले, “दोन महिन्यांपूर्वी…”

क्षितिजाच्या गावच्या घरी प्रथमेशचं खास रांगोळी काढून स्वागत करण्यात आलं. यावर “वेलकम टू सासुरवाडी” असं लिहिण्यात आलं होतं. याशिवाय सारवलेल्या अंगणात तुळशी वृंदावनासमोर या जोडप्याने खास फोटोशूट केलं. यावर “जावई @सासुरवाडी” असं कॅप्शन क्षितिजाने दिलं आहे.

prathamesh
प्रथमेश परब

हेही वाचा : मराठमोळी प्राजक्ता माळी आणि बॉलीवूड सुपरस्टार गोविंदा यांची ग्रेटभेट! फोटो शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रथमेश-क्षितिजाची पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. पुढे हळुहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अभिनेत्याने पहिल्यांदा १४ फेब्रुवारी २०२० रोजी व्हेलेंटाईन डेची फोटोशूट सीरिज पाहून क्षितिजाला मेसेज केला होता. आता येत्या २४ फेब्रुवारीला ही जोडी लग्नंबधनात अडकणार आहे.