मराठी मनोरंजन विश्वातील उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे ओळखले जातात. सध्या ते ‘धर्मवीर २’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. प्रवीण तरडेंनी रंगभूमीपासून आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली. प्रायोगिक नाटकांसाठी काम करत असताना प्रवीण तरडेंची स्नेहल यांच्याशी ओळख झाली. काही दिवसांत दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी २००९ मध्ये लग्नगाठ बांधली. आज त्यांच्या लग्नाला १४ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने त्यांची प्रेमकहाणी जाणून घेऊया…

प्रवीण तरडे यांनी साधारण २००४ मध्ये नोकरी सोडून प्रायोगिक नाटकात काम करण्यास सुरुवात केली. नोकरी सोडून नाटकात काम करायचा निर्णय घेतल्याने त्यांना राहत्या घरातून बाहेर काढण्यात आलं होतं. याचदरम्यान एकांकिका स्पर्धेत काम करताना प्रवीण आणि स्नेहल यांची ओळख झाली. नाटकाच्या प्रयोगासाठी तेव्हा दोघंही बाईकवरुन प्रवास करायचे. हळुहळू दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. प्रवीण तरडेंचं नाटकावरचं प्रेम, त्यांची तळमळ पाहून स्नेहल भारावून गेल्या होत्या. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन प्रवीण तरडे यांनी स्नेहल यांना लग्नाची मागणी घातली. त्यांनी सुद्धा होकार कळवला. मात्र लग्नाचा विषय घरी समजल्यावर दोघांच्या नात्याला विरोध करण्यात आला होता.

हेही वाचा : Video : ना मॉल, ना दुकानं…; शशांक केतकरने बायकोसाठी थेट तुळशी बागेत केली खरेदी! नेटकरी म्हणाले, “पुण्यातील पोरी…”

प्रायोगिक नाटकांमधून घर चालवण्याइतके पैसे जमत नव्हते. त्यात स्नेहल आणि प्रवीण यांच्या वयात तब्बल १२ वर्षांचं अंतर होतं. घर नाही, पैसे नाही आणि वयातील अंतर पाहून स्नेहल यांच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला. यानंतर एके दिवशी प्रवीण यांनी स्नेहलला तुझ्या आईला मी मालिकांचं लिखाण करतो असं सांगायला सांगितलं. परंतु, स्नेहल आईशी खोटे कसं बोलणार या विचारात होत्या. अशा परिस्थितीत प्रवीण तरडेंनी मुंबईतील मित्रांना फोन करुन मालिका लेखनाचं काम मिळवलं. अग्निहोत्र आणि असंभव मालिकेचं कोणतंही क्रेडिट न घेता प्रवीण तरडे यांनी लेखन केलं होतं. या कठीण परिस्थितीवर मात करुन पुढे प्रवीण तरडेंनी मराठी कलाविश्वात मोठं नाव कमावलं. ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ अशा दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने भर कार्यक्रमात रितेश देशमुखला पाहिलं अन्…; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आपल्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज प्रवीण आणि स्नेहल यांच्या लग्नाला १४ वर्ष पूर्ण झाल्याने दोघांनीही सोशल मीडियावर रोमँटिक पोस्ट शेअर करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. “१४ पूर्ण !! तुझ्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय तू.. अपूर्णच! एकमेकांना अशीच साथ देत राहू आणि आयुष्य पूर्णत्वास नेऊ.” असं कॅप्शन स्नेहल यांनी त्यांच्या पोस्टला दिलं आहे. सध्या नेटकरी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.