दाक्षिणात्य सुपस्टार देव गिल लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. निर्मात्यांनी या आगामी चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवलं असून लवकरच पुण्यातील एका भव्य कार्यक्रमात संबंधित चित्रपटाचं पोस्टवर व नाव जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भात मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी माहिती दिली आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार देव गिल प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटात प्रवीण तरडे, तेजस्विनी पंडित, सयाजी शिंदे, चित्रा शुक्ला अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी असणार आहे. प्रवीण तरडेंसह तेजस्विनीने या चित्रपटातील सुपरस्टार देवचा पहिला पाठमोरा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “प्रिय झी मराठी…”, कुशल बद्रिकेचं भावुक पत्र! ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाबद्दल म्हणाला, “रात्रीच्या अंधारात…”

“महाराष्ट्राचा सुपुत्र आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार लोकप्रिय दिग्गज अभिनेता देव गिल आता महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी येत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील पहिला ब्लॉकबस्टर पॅन इंडिया चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. तर, मंडळी आता तयार व्हा and hold your breath. देव गिल अभिनेता आणि पेटा त्रिकोटी चीफ डायरेक्टर एस एस राजामौली फिल्म्स दिग्दर्शित देव गिल प्रोडक्शनच्या पहिल्या चित्रपटाचा First look पाहण्यासाठी. याचं अनावरण पुण्यातील डांगे चौकात ८ मार्चला सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एका भव्य कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या चित्रपटात एका धाडसी आणि दृढनिश्चयी पोलिसांची वीरगाथा तुम्हाला पाहायला मिळेल” असं प्रवीण तरडेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : प्रेग्नन्सीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच दीपिका-रणवीरचा जबरदस्त डान्स; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमधील व्हिडीओ चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रवीण तरडेंनी चित्रपटासंदर्भात माहिती दिल्यावर “तुमचा खूप जास्त अभिमान वाटतोय” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय हा चित्रपट तेलुगू, मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली असा ७ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.