ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी १५ जुलै रोजी समोर आली. पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये ते मृतावस्थेत आढळले. तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज होता. वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांचा मुलगा व अभिनेता गश्मीर आधी तळेगावला पोहोचला. त्यानंतर रवींद्र महाजनींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पुण्यातील ससून रुग्णालयात करण्यात आले.

आणखी वाचा – पत्नी, मुलगा, सून अन्…, असं आहे रवींद्र महाजनींचं कुटुंब

डॉक्टरांनी शनिवारी (१५ जुलै) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पार्थिव कुटुंबियांना सोपवले, त्यानंतर रवींद्र महाजनींवर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्र महाजनी यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास विद्युती दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी रवींद्र महाजनी यांच्या कुटुंबीयांसह, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, दिग्दर्शक प्रविण तरडे,अभिनेते रमेश परदेशी हे अंत्यसंस्कार वेळी उपस्थित होते. वडिलांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर भावुक गश्मीरला प्रवीण तरडे धीर देताना दिसले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्मशानभूमीतून बाहेर पडणाऱ्या गश्मीरला प्रवीण तरडेंनी धीर दिला. त्यावेळचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.