मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे यांना ओळखलं जातं. ‘धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’ असे त्यांचे एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले. त्यांच्या या चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यांचे काही आगामी चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. सध्या प्रवीण यांना त्यांच्या कामामधून निवांत वेळ मिळाला आहे. म्हणूनच ते पत्नी स्नेहल तरडेबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये सुट्ट्या एण्जॉय करताना दिसत आहेत.

आणखी वाचा – एमसी स्टॅनच्या मुंबईमधील कॉन्सर्टला जमली हजारोंची गर्दी, एका तिकिटाची किंमत होती तब्बल…

प्रवीण व स्नेहल ऑस्ट्रेलियामधील विविध शहरांमध्ये भटकंती करत आहेत. यादरम्यानचेच व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. असाच त्यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मराठी तरुण मुलाने ऑस्ट्रेलियांमध्ये जाऊन त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. याचबाबत प्रवीण यांनी एक व्हिडीओ फेसबुकद्वारे शेअर केला आहे.

ते म्हणाले, “ऑस्ट्रेलियातील मराठीबाणा. ६५ किलो घरी बनवलेले फरसाण घेऊन कराडचा योगेश चव्हाण हा मराठी तरूण ॲास्ट्रेलियात आला. आज इथे वर्षाला ७० हजार किलोचा माल तो विकत आहे. आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधून त्याला उद्योजक तयार करायचे आहेत.” प्रवीण यांनी योगेश चव्हाण यांच्याशी संवादही साधला.

आणखी वाचा – नवाजुद्दीन सिद्दीकीचा संसार मोडला, घटस्फोटाबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, “गेल्या काही वर्षांपासून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रातील विविध भागामधून येणार खाद्यपदार्थ योगेश ऑस्ट्रेलियामध्ये विकतात. तसेच महाराष्ट्रातील छोट्या उद्योजकांनाही फायदा मिळवून देतात. गेली २२ वर्ष ते परदेशामध्ये व्यवसाय करत आहेत. योगेश यांचा मराठी माणसाला अभिमान असला पाहिजे असंही प्रवीण यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. प्रवीण यांच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर अधिकाधिक पसंती मिळत आहे.