मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे यांना ओळखलं जातं. मराठीसह हिंदी कलाविश्वात त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर ते विविध विषयांवरील व्हिडीओ शेअर करत असतात. प्रवीण तरडे एका कार्यक्रमासाठी नुकतेच चीनमध्ये गेले होते. यासंदर्भातील व्हिडीओ त्यांनी नुकताच फेसबुकवर शेअर केला आहे.

चीनच्या शांघाय शहरात ‘चायनाप्लास २०२४’ हे जगातील सर्वात मोठं प्लास्टिक उद्योगातील प्रदर्शन भरतं. याला नुकतीच प्रवीण तरडेंनी भेट दिली. यंदा या प्रदर्शनाला महाराष्ट्रातून पाच हजार उद्योजकांनी हजेरी लावल्याचं प्रवीण तरडेंनी त्यांच्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

हेही वाचा : तावडे सिस्टर्स! तितीक्षाच्या लग्नाला २ महिने पूर्ण झाल्यावर खुशबूने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, “मी तुझ्या…”

प्रवीण तरडे सांगतात, “नमस्कार मंडळी आज आपण चायनामध्ये आलोय. चीनमध्ये जगातील सर्वात मोठं प्लास्टिक उद्योगातील प्रदर्शन भरलंय. याला ‘चायनाप्लास २०२४’ असं देखील म्हणतात. दर तीन वर्षांनी हे प्रदर्शन भरतं आणि अनेक नामवंत मंडळी येथे येतात. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे या एवढ्या मोठ्या कार्यक्रमात आपला मराठी झेंडा सुद्धा आहे. महाराष्ट्रातून देखील उद्योजक याठिकाणी आले आहेत.”

हेही वाचा : Video : ‘कन्यादान’ फेम अमृता बनेचं सासरी ‘असं’ झालं स्वागत! सूनबाई अन् लेकासाठी सासऱ्यांनी केली खास तयारी

“चायनाच्या शांघाय शहरात हा मराठी माणसाचा झेंडा पाहून खूप छान वाटतं. हे सगळे उद्योजक आता नवीन तंत्रज्ञान घेऊन महाराष्ट्रात येणार आहेत. जे लोक म्हणतात ना…मराठी माणूस व्यवसाय करत नाही फक्त नोकरी करतो. त्यांना माझं एकच सांगणं आहे की, हे फक्त या व्हिडीओमध्ये आहेत. याठिकाणी महाराष्ट्रातून जवळपास ४ ते ५ हजार लोक आले आहेत. फक्त पुणे जिल्ह्यातून पाचशे उद्योजक आले आहेत. या सगळ्यांना माझ्या खूप शुभेच्छा! मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात पाय रोवून उभा आहे. असाच आपला झेंडा कायम फडकवत ठेवा जय महाराष्ट्र!” असं प्रवीण तरडेंनी या व्हिडीओमध्ये सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रवीण तरडेंनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. दिग्दर्शकाने या व्हिडीओमध्ये प्रत्येक मराठी उद्योजकाची ओळख करून दिली. तसेच भारतात आल्यावर यांना प्रोत्साहन देऊन पाठिंबा द्या असंही त्यांनी चाहत्यांना सांगितलं आहे.