Priya Bapat shared a video: प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी जवळजवळ ११ वर्षांनंतर पडद्यावर एकत्र झळकली. १२ सप्टेंबर २०२५ ला बिन लग्नाची गोष्ट हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटात निवेदिता सराफ व गिरीश ओक हे कलाकारदेखील प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता प्रिया बापटने शेअर केलेला व्हिडीओ शेअर केला आहे.

प्रिया बापटने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान कलाकार मजा मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये विविध लूकमध्ये प्रिया डान्स करताना दिसत आहे. पुढे काही ठिकाणी उमेश कामत दिसत आहे. त्याबरोबरच सीनची तयारी करताना गिरीश ओक आणि निवेदिता सराफदेखील दिसत आहेत.

हा व्हिडीओ शेअर करताना प्रियाने, ‘बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे झालेला आनंद आणि ऋतिकाचा हॅपी डान्स’, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकरी काय म्हणाले?

प्रियाने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत प्रियाचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “कालच चित्रपट पाहिला. खूप सुंदर आहे. खरं तर मला उमेशदादा आवडतो म्हणून मी चित्रपट पाहायला गेले होते; पण तुझं कामही खूप छान आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “जुळं होणार हे नक्की”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप सुंदर प्रियाताई” असे लिहीत चाहत्यांनी प्रियाच्या चित्रपटातील भूमिकेचे कौतुक केले आहे.

याबरोबरच, “अभिनंदन”, “काळजी घे आणि ऑल द बेस्ट”, “फर्स्ट डे फस्ट शो पाहिला. अतिशय सुंदर चित्रपट”, “अभिनंदन”, अशा काही कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटाबरोबर हृता दुगुळे व ललित प्रभाकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला आरपार हा सिनेमा १२ तारखेला प्रदर्शित झाला आहे. त्याबरोबरच ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार हा सिनेमादेखील त्याच दिवशी प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या तीनही सिनेमांचे मोठे कौतुक होताना दिसत आहे. दशावतार या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. आता आगामी काळात हे सिनेमे किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.