प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी आहे. प्रिया आणि उमेशने जवळपास ८ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०११ मध्ये लग्न केलं. सध्या हे जोडपं त्यांच्या नव्या नाटकामुळे चांगलंच चर्चेत आहे. प्रेक्षकांना उमेश-प्रियाच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबरोबरच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री सुद्धा आवडते. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकतेच तिने उमेश कामतबरोबर काही रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा : “माय मॅन…”, प्रथमेशच्या वाढदिवसासाठी मुग्धाची खास पोस्ट, गोव्यातून शेअर केला रोमॅंटिक फोटो

प्रिया बापट या फोटोंमध्ये लाडक्या नवऱ्याच्या गालावर किस करताना दिसत आहे. “सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं मला भयंकर आवडतं…तळटीप – खूप आवडीच्या गोष्टीला “भयंकर आवडणे” ही उपमा माझी काकू द्यायची. “भयंकर” या शब्दाचा असाही वापर” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.

हेही वाचा : “माझ्या मुलीने किसिंग सीन दिला तर…”, रवीना टंडनने केलं स्पष्ट भाष्य, म्हणाली, “जर ती…”

अभिनेत्रीच्या फोटोवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, “आई गं…आजचा दिवस सुंदर जाणार सकाळ सकाळ एवढे सुंदर चेहरे पाहिले” दुसऱ्या एका युजरने, “असं मुक्तपणे जगता आलं पाहिजे” आणखी काही युजर्सनी या फोटोवर, “मला तुमची जोडी भयंकर आवडते”, “किती गोड” अशा अनेक कमेंट्स प्रिया-उमेशच्या रोमॅंटिक फोटोंवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा : एका दशकाचा संघर्ष, अपयशाने खचली पण ‘त्या’ तीन दिवसांनी बदललं आयुष्य; जाणून घ्या वामिका गब्बीबद्दल खास गोष्टी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘जर तरची गोष्ट’या नाटकाला प्रेक्षक सध्या भरभरून प्रतिसाद देत आहे. या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाटकाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून, दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केले आहे. या नाटकात प्रिया बापट ‘राधा’, तर उमेश कामत ‘सागर’ ही भूमिका साकारत आहे.