अभिनेत्री प्रिया बापट सध्या तिच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकामुळे चांगलीच चर्चेत आहे. या नाटकाच्या निमित्ताने प्रिया नवरा उमेश कामतसह जवळपास १० वर्षांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करणार आहे. प्रियाने यापूर्वी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये साकारलेल्या ‘पूर्णिमा गायकवाड’ या पात्रालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

हेही वाचा : श्रद्धा कपूरला आवडतो ‘हा’ मराठमोळा पदार्थ, फोटो शेअर करत म्हणाली, “गणेश चतुर्थीपर्यंत…”

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”

‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या पर्वात पूर्णिमा गायकवाड हे पात्र महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आहे. याच संदर्भात प्रियाला नुकत्याच दिलेल्या तारांगणच्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. “जर तुला खऱ्या आयुष्यात मुख्यमंत्री किंवा तत्सम मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली तर सर्वसामान्यांसाठी तू सर्वात आधी काय करशील?” या प्रश्नाला उत्तर देत प्रिया म्हणाली, “महिला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर, रस्ते…सगळ्यात आधी मुंबईचे रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न करेन.”

हेही वाचा : Video : “पावसाळी ट्रेक अन् गडावर जेवणाचा बेत”, मराठमोळा अभिनेता फिरतोय सह्याद्री, व्हिडीओ व्हायरल

“रस्ते हे मुंबईकरांसाठी सर्वात जास्त गरजेचे आहेत. त्यामुळे इतर काही करण्यापेक्षा रस्त्यांमध्ये सुधारणा करेन. महत्त्वाच्या कामाच्या ठिकाणी जाताना अनेकदा रस्त्यांमुळे समस्या उद्भवतात त्यामुळे मला लोकांचा प्रवास सुखकर करायला नक्कीच आवडेल.” असे प्रिया म्हणाली.

हेही वाचा : “त्यांचा कुणालाही फसवण्याचा हेतू नव्हता”, नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर मुलगी मानसीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “चुकीची माहिती…”

अभिनेता उमेश कामत याविषयी सांगताना म्हणाला, “मी अशी कोणती भूमिका केली नाही त्यामुळे यासंदर्भात विचार केला नव्हता. परंतु जर खऱ्या आयुष्यात असे कोणतेही मोठे पद मिळाले तर, सर्वप्रथम लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. काही शिस्त, ट्राफिकचे नियम सर्वांनी पाळणे अपेक्षित असते. काही मुलभूत प्रश्नांसाठी आपण आजही संघर्ष करतोय तर असे प्रश्न प्रामाणिकपणे लवकर सोडवता येतील का याकडे लक्ष देईन.”

हेही वाचा : सलमान खानचे फॉलोवर्स कमी झाले म्हणून राखी सावंत भडकली; व्हिडीओ झाला व्हायरल

दरम्यान, प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ५ ऑगस्टला संपन्न झाला असून लोकांनी या प्रयोगाला चांगला प्रतिसाद दिला आहे. या नाटकात प्रिया-उमेशसह पल्लवी अजय आणि आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.