सध्या महाराष्ट्रभर ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘गोष्ट एका पैठणीची’च्या  खास शोचे आयोजनही करण्यात येत आहे. नुकतंच पुण्यामध्ये क्रांतीज्योती महिला प्रतिष्ठानच्या सभासदांसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या वतीने ‘गोष्ट एका पैठणीची’चा खास शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवणकाम करणाऱ्या एका महिलेला पैठणी जिंकण्याचा मान मिळाला.

‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या महिलांसाठी एका लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. या लकी ड्रॅामध्ये अलका मेमाणे नशीबवान विजेत्या ठरल्या. यावेळी त्यांना रुपाली चाकणकरांच्या हस्ते पैठणी प्रदान करण्यात आली. पैठणी जिंकल्यानंतर अलका मेमाणे यांना भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले.
आणखी वाचा : “होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात…” सायली संजीवने सांगितली आदेश बांदेकरांबद्दल ‘ती’ आठवण

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा

यावेळी त्या म्हणाल्या, “मी १९८७ पासून शिवणकाम, फॉल बिडिंगचे काम करत आहे. शिवणकाम करताना माझ्याकडे अनेक पैठण्या आल्या. पैठणीवर काम करताना खूप काळजी घ्यावी लागते. त्याला लहान बाळासारखं जपावे लागते. चित्रपट बघताना ही माझीच गोष्ट आहे, असे मला वाटत होते.”

“या चित्रपटात जसा इंद्रायणीच्या कुटुंबाचा तिला पाठिंबा होता, तसाच माझ्या कुटुंबाचा देखील आहे. जेव्हा रुपाली ताईंनी माझे नाव जाहीर केले, तेव्हा क्षणभर माझी खात्रीच पटली नाही. माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. मी इथे येऊन मी भाग्यवान विजेती ठरेन, असे माझ्या ध्यानी मनीही नव्हते”, असेही त्यांनी म्हटले.

आणखी वाचा : “आमच्या नात्यात दुरावा…” ऋतुराज गायकवाडबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांना सायली संजीवने दिला पूर्णविराम

दरम्यान ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट २ डिसेंबर २०२२ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर, सुहिता थत्ते, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, आदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.