Rinku Rajguru talks about her crush: आपल्यापैकी अनेकजण आपल्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतात. ते पडद्यामागे खरे कसे असतात, त्यांचा स्वभाव नेमका कसा आहे, त्यांचे आवडते कलाकार कोण अशा अनेक गोष्टी चाहते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
आता विविध मुलाखती, सोशल मीडियावरील पोस्ट, व्हिडीओ, फोटो यामुळे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकरांबाबत बरीचशी माहिती असते. कलाकार स्वत: त्यांच्या चाहत्यांबरोबर त्यांच्याबद्दलची माहिती शेअर करत असतात. त्यामुळे अगदी सहज कलाकारांच्या व्यावसायिक तसेच खासगी आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना माहिती मिळते. याबरोबरच, कलाकारांनी मुलाखतीत केलेली वक्तव्ये अनेकदा चर्चेत असतात.
रिंकू राजगुरू म्हणाली…
आता अभिनेत्री रिंकू राजगुरूला एका मुलाखतीत तिचा क्रश कोण आहे, असा प्रश्न विचारला. अभिनेत्री रिंकू राजगुरूने काही दिवसांपूर्वी ‘सकाळ प्रिमिअर’शी संवाद साधला.
यावेळी तिला विचारले की तुझा क्रश कोण आहे, ज्याच्याबरोबर तुला काम करण्याची इच्छा आहे? यावर रिंकू म्हणाली, “मला सगळ्यांबरोबर काम करायचं आहे. मला एका कोणाचं नाव सांगता येणार नाही. क्रश म्हणून एखाद्या अभिनेत्याचं नाव सांगता येणार नाही. कारण- मला खूप लोकं आवडतात. मला विक्रांत मेस्सी, विकी कौशल, कमल हसनजी या सगळ्यांचं काम आवडतं.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मला असं वाटतं की आपण स्मिता पाटील, श्रीदेवी यांच्यासारखी कामं केली पाहिजेत. आपल्या मराठी इंडस्ट्रीत किती चांगले नट आहेत. मला सगळ्या चांगल्या कलाकारांबरोबर काम करायचं आहे”, असे म्हणत रिंकूने सगळ्या चांगल्या कलाकारांबरोबर काम करायचं आहे,असे सांगितले.
रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे तर २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिचा पहिलाच चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला. सैराट असे या चित्रपटाचे नाव आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित या सिनेमात अभिनेत्रीने आर्ची ही भूमिका साकारली होती. सैराट चित्रपटाची पटकथा, गाणी, संवाद, ग्रामीण जीवन अशा सगळ्याच गोष्टींमुळे चित्रपटाला मोठी लोकप्रियता मिळाली. आर्ची आणि परशाने प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाने वेड लावले होते.
सैराटनंतर रिंकूने ‘झिम्मा २’, ‘झुंड’, ‘कागर’,’२०० हल्ला हो’ अशा सिनेमांत काम करत तिची ओळख निर्माण केली. नुकतीच ती सुबोध भावे व प्रार्थना बेहेरे यांच्याबरोबर ‘बेटर हाफची लवस्टोरी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता आगामी काळत अभिनेत्री कोणत्या चित्रपटातून तसेच कोणत्या हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.