रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आज एक आठवडा पूर्ण झाला आहे. तरीही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. जिनिलीयाचं मराठीमध्ये पदार्पण तर रितेशचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या सेलिब्रिटी कपलने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”

‘वेड’ चित्रपट प्रदर्शित होऊन आज एक आठवडा झाला आहे. आता आठवड्याभरामध्ये या चित्रपटाने कितपत कमाई केली हे समोर आलं आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी २५ लाख रुपये कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ३ कोटी २५ लाख रुपये गल्ला जमावला. रविवारी ४ कोटी ५० लाख तर सोमवारी ३ कोटी रुपये ‘वेड’ चित्रपटाने कमावले.

प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी २ कोटी ६५ लाख रुपये तर सहाव्या दिवशी २ कोटी ५५ लाख रुपयांचा फायदा ‘वेड’ चित्रपटाला झाला. आठवड्याभरामध्ये ‘वेड’ने २० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे.

आणखी वाचा – रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’ची कौतुकास्पद कामगिरी, बॉलिवूड चित्रपटाला मागे टाकत चार दिवसांतच कमावले इतके कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वेड’ चित्रपटाच्या तुलनेत इतर बॉलिवूड चित्रपटांची जादू मात्र फिकी पडली. रणवीर सिंगच्या ‘सर्कस’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी अगदी पाठ फिरवली. आता प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ‘वेड’ आणखी रेकॉर्डब्रेक कमाई करणार का? हे पाहावं लागेल.