अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट गेले अनेक दिवस चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या टीझरमधील रितेश व जिनिलीयाची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक थक्क झाले. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश आणि जिनिलीया पहिल्यांदाच मराठी चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. आता या चित्रपटातील पहिलं गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

‘वेड तुझा’ असं या चित्रपटामधील गाण्याचं नाव आहे. या गाण्यात रितेश अभिनेत्री जिया शंकरबरोबर रोमान्स करताना दिसत आहे. समुद्रकिनारी चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यातून रितेश देशमुख आणि जिया शंकर यांच्यातलं प्रेम फुलताना दिसून येत आहे. लोकप्रिय जोडी अजय-अतुल यांनी या चित्रपटाच्या गाण्यांना संगीत दिलं आहे. “वेड तुझा विरह वणवा” असे या गाण्याचे बोल आहेत. अजय-अतुलच्या आवाजातील हे गाणं अत्यंत मंत्रमुग्ध करणारं आहे.

आणखी वाचा : ‘पैठणी’ चित्रपटाचा ट्रेलर आता रुपेरी पडद्यावर; आनंद व्यक्त करत सायली संजीव म्हणाली…

रितेश देशमुखने हे गाणे सोशल मिडीयावरून चाहत्यांशी शेअर करत लिहीलं, “प्रेमाचा अर्थ तेव्हाच कळतो जेव्हा तुम्ही त्यातला वेडेपणा अनुभवता, सादर करतो आहे आमच्या सिनेमातलं पाहिलं गाणं ‘वेड तुझा’ You call it Love, we call it Madness!”

हेही वाचा : Ved Teaser : “…तर काही प्रेमातलं वेड होतात” रितेश-जिनिलीयाच्या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनेच केलं आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण करत आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.