‘शोले’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये नवा इतिहास घडवला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले होते. या चित्रपटातील जय-वीरु. बसंती. गब्बर, ठाकूर सारखी सगळीच पात्र चांगली गाजली होती. या व्यतरिक्त आणखी एका कलाकाराने प्रेक्षकांच्या मन जिंकली होती. ते कलाकार म्हणजे मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावकर. ‘शोले’मध्ये त्यांनी अहमदची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले होते. एका मुलाखतीत सचिन यांनी ‘शोले’ मधील या भूमिकेसाठी त्यांना मिळालेल्या मानधनाचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- प्राजक्ता गायकवाडने पाहिला ‘बाईपण भारी देवा’, सुचित्रा व सोहम बांदेकरच्या कामाबद्दल प्रतिक्रिया देत म्हणाली…

एका मुलाखतीत सचिन यांनी शोले चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाचा खुलासा केला आहे. सचिन यांनी शोले चित्रपटात इमाम चाचा यांचा मुलगा अहमदची भूमिका साकारली होती. चित्रपटातील भूमिकेसाठी सचिन यांनी १९ दिवसांचे शुटींग केलं होतं. पण त्यावेळी त्यांच वय लहान असल्यामुळे त्यांचे सगळेच सीन या चित्रपटात दाखवण्यात आले नव्हते. शोलेच्या वेळी सचिन केवळ १७ वर्षांचे होते. त्यामुळे त्यांचे असे सीन्स पाहून प्रेक्षक कशी प्रतिक्रिया देतील या विचाराने दिग्दर्शकाने ते सीन्स काढून टाकले होते.

हेही वाचा- Video : ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्याची परदेशातही क्रेझ, अडीच वर्षाच्या मुलीचा गातानाचा व्हिडीओ पाहून गायिका म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटासाठी सचिन यांनी कोणतेही मानधन देण्यात आले नव्हते. तर मानधनाऐवजी त्या एक फ्रिज भेट म्हणून देण्यात आला होता. अनेक मुलाखतींमध्ये सचिन यांनी याबाबचा खुलासा केला आहे. ही भेटवस्तू त्यांच्यासाठी मानधनापेक्षा जास्त महत्वाची असल्याचे त्यांनी अनेकदा म्हणलं आहे.