Hemal Ingley Shared A Post : ‘नवरा माझा नवसाचा’ हा मराठीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. हल्ली अनेक गाजलेल्या जुन्या चित्रपटांचे रिमेक तसेच सिक्वल बनताना दिसतात. गेल्या वर्षी सचिन पिळगावकर यांच्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचाही दुसरा भाग प्रदर्शित झालेला. अशातच आता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन १ वर्ष पूर्ण झाली आहेत.

‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात अभिनेते सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावंकर यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या तर ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये त्यांच्याबरोबर अभिनेता स्वप्नील जोशी व अभिनेत्री हेमल इंगळेसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकलेले. अशातच आता चित्रपटाला प्रदर्शित होऊन १ वर्ष झाल्यानिमित्त हेमलने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

हेमल इंगळेने शेअर केली पोस्ट

हेमलने ‘नवरा माझा नवसाचा २’च्या चित्रीकरणावेळीचे काही खास फोटो शेअर करत त्यांना कप्शन दिली आहे. यावेळी तिने म्हटलं की, “‘नवरा माझा नवसाचा २’ ला एक वर्ष पूर्ण झालं, माझ्या मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटाला १ वर्ष झालं आहेत. श्रद्धा हे पात्र साकारुन एक वर्ष झालं, या सर्व दिग्गज मंडळींबरोबर काम करुन एक वर्ष झालं. सगळ्यासाठी खूप कृतज्ञ आहे.”

सचिन पिळगावंकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट २० सप्टेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला. आता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक वर्षं पूर्ण झालं आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केलेली. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात मोठ्या संख्यने गर्दी केलेली. माध्यमांच्या माहितीनुसार या चित्रपटाने जवळपास २०-२५ कोटींचा गल्ला जमावलेला.

‘नवरा माझा नवसाचा २’ हा हेमलच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई केलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. अभिनेत्रीने याबद्दल शेअर केलेल्या पोस्टमधून म्हटलं आहे. यावेळी तिने सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, यांच्याबरोबरचे खास फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान, हेमलने यापूर्वी ‘अशी ही आशिकी’, ‘उनाड’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘पक्या पिंकी आणि साहेब’, ‘हार्दिक शुभेच्छा’ यांसारख्या चित्रपटांत मुख्य नायिकेची भूमिका साकारली आहे.