‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळत आहे. नुकतंच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा चित्रपट पाहिला. त्यानंतर सचिन तेंडुलकरने या चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. केदार शिंदे यांनी राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांच्यासाठी एका खास शोचे आयोजन केले होते. यावेळी सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीसह हजेरी लावली. हा चित्रपट पाहिल्यानतंर सचिनने एक ट्वीट केले आहे. त्यात त्याने चित्रपट कसा वाटला, याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ची रितेश देशमुखच्या ‘वेड’ला टक्कर, ३५ दिवसात कमावले इतके कोटी

“‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात ६ बहिणींची हृदयस्पर्शी कथा दाखवण्यात आली आहे. हा मराठी चित्रपट पाहून मला खरंच खूप आनंद झाला. मी, माझी आई आणि मावशीबरोबर हा चित्रपट पाहण्यासाठी फारच उत्सुक आहे. त्याबरोबरच या चित्रपटातील कलाकारांना प्रत्यक्ष भेटता आलं, हा देखील एक सुंदर अनुभव होता”, असे सचिन तेंडुलकरने म्हटले आहे.

तर केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी सचिनबरोबरचा एक खास फोटो पोस्ट केला आहे. “जेव्हा क्रिकेटचा “देव”… “बाईपण भारी देवा” सिनेमा पहातो… श्री स्वामी समर्थ महाराज की जय”, असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. सध्या हा फोटो व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : शिंदेशाहीतला एक तारा निखळला, आनंद शिंदेंच्या पुतण्याचं निधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.