मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर निर्माता अनिश जोगला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच सईचा वाढदिवस होता, त्यानंतर आज अनिशचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सईने पोस्ट शेअर केली आहे. सईने एक फोटो व एक व्हिडीओ शेअर करत अनिशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“बिग बॉस अश्लीलतेचे मॉडेल”, आकांक्षा पुरी-जैद हदीदच्या किसिंग प्रकरणावर भाजपा नेत्याचा संताप; म्हणाले, “हिंदू मुलगी…”

“हॅप्पी बर्थडे माय जेम! भरभरून जग, खूश रहा. त्यांनी तुझ्यासारखे लोक निर्माण करणं थाबवलंय, पण तू माझ्या आयुष्यात आहेस, याचा मला आनंद आहे,” असं कॅप्शन सईने पोस्टला दिलंय. या पोस्टमधील फोटो सईच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा आहे. अनिशने ‘थँक्स माय लव्ह’ अशी कमेंट सईच्या पोस्टवर केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रार्थना बेहेरे, प्रसाद ओक, मंजिरी ओक, स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी यांनीही कमेंट्स करत अनिशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अनिश व सई व्हेकेशनसाठी स्पेनला गेले होते. तिथले काही फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.