मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायक, संगीतकार सलील कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असतात. तसेच चालू घडामोडींवर परखड मत व्यक्त करतात. शिवाय मजेशीर गोष्टी देखील चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी ‘एका माकडाने काढले दुकान’ या गाण्यासंबंधित पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

सलील कुलकर्णी यांनी ‘एका माकडाने काढले दुकान’ या गाण्याचा भन्नाट एडिटेड व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘द आर्चीज’ चित्रपटातील सुहाना खानच्या डान्सच्या मागे ‘एका माकडाने काढले दुकान’ हे गाणं लावून भन्नाट एडिट केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हाच व्हिडीओ शेअर करत सलील कुलकर्णींनी पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा – Video: हर्षवर्धनच्या नव्या डावावर विश्वास ठेवून सागर सईला देतो वाईट वागणूक अन् मग मुक्ता…, नक्की काय घडतं? वाचा

सलील कुलकर्णी यांनी लिहिल, “‘एका माकडाने काढले दुकान..आली गिऱ्हाईके छान छान’ विंदांच्या या कवितेचं मी १९९९ मध्ये गाणं केलं होतं…आत्ताची धृपद गायिका मेघना सरदार तेव्हा १०-११ वर्षांची होती, तिने ते गायलं होतं…लहान मुलांच्या अनेक पिढ्यांनी हे मनापासून ऐकलं…दाद दिली…नंतर अनेक युट्यूब चॅनलने याचे उथळ हिंदी भाषांतर करून माझ्याच चालीत रिलीज केलं…मी अर्थातच निषेध सुद्धा नोंदवलेला नाही…मग हळूहळू मराठीतल्या पण अनेक युट्यूब चॅनलने विंदा किंवा माझा उल्लेख न करता ते वाजवले, त्याचा व्हिडिओ केला. मी पुन्हा एकदा जगभरातील मुलांनी ऐकलं …त्यांना आवडलं हे खूप आहे, असा समजूतदार (खरं तर बावळट आणि आळशी) धोरण स्वीकारलं…”

पुढे सलील कुलकर्णींनी सुहानाच्या त्या व्हायरल व्हिडीओ संदर्भात लिहिल. ते म्हणाले, “आता काही दिवसांपूर्वी हे गाणं या धमाल एडिटिंग सकट बघायला मिळालं…ते सुद्धा व्हायरल झालं..आता तर मी निषेध वगैरे ओलांडून…हसण्याच्या स्टेजला आलो आहे… विंदांच्या घरी बसून त्यांना हे गाणं ऐकवलं होतं…त्यांनी हा व्हिडिओ पाहिला असता तर ‘माझ्या मना बन दगड’ नावाची त्यांची कविता ऐकावयाला त्यांना अजून एक कारण सापडले असते…तर ‘एका माकडाने काढले दुकान’ या गाण्याचा प्रवास गमतीशीर चालू आहे…आजची छोटी मुलं सुद्धा ते गाणं ऐकतायत…विंदा….आपलं गाणं हिट आहे…”

हेही वाचा – ‘पांडू हवालदार’पूर्वी अशोक सराफ यांनी का घेतला होता चार वर्षांचा ब्रेक? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलील कुलकर्णी यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. कलाकारांसह नेटकऱ्यांनी या पोस्टवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या पोस्टला २ हजारहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.