मराठी कलाविश्वातील लोकप्रिय संगीतकार व उत्तम गायक म्हणून सलील कुलकर्णी यांना ओळखलं जातं. त्यांचा व संदीप खरेंचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांना ‘एकदा काय झालं’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ते सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांनी नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

सलील कुलकर्णींचा लेक शुभंकर सुद्धा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत संगीत क्षेत्रात स्वत:ची एक नवीन ओळख निर्माण करत आहे. त्याचं पहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. यानिमित्ताने गायकाने खास पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा, शेअर केले खास फोटो

शुभंकर अवघ्या दोन वर्षांचा असताना त्याने ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ हे गाणं गायलं होतं आणि आता एक तरुण गायक म्हणून त्याचं पहिलं हिंदी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. “तुम जाओ मत… रहो…” असे या गाण्याच्या बोल आहेत.

हेही वाचा : लग्नानंतर ऑस्ट्रेलियात गेलेली पूजा सावंत दीड महिन्यांनी मुंबईत परतली? ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

सलील कुलकर्णी म्हणतात, “तुम जाओ मत… रहो..हे स्वानंद किरकिरेंच्या कवितेचं मी केलेलं गाणं…आता शुभंकरच्या आवाजात…शुभंकरने गाताना माझी चाल उत्तम गायली आहेच पण, प्रत्येक शब्द पोहोचवायचा केलेला प्रयत्न मला मनापासून आवडला… तुम्हालाही आवडेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलील कुलकर्णींनी ही खास पोस्ट शेअर करत लाडक्या लेकाचं भरभरून कौतुक केलं आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी देखील शुभंकरचा आवाज खूपच सुंदर असल्याचं कमेंट्स सेक्शनमध्ये म्हटलं आहे.