शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘ठाकरे’ या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अमृता राव मुख्य भूमिकेत आहेत. नवाजच्या अभिनयाची आणि लूकची त्यावेळी बरीच चर्चा रंगली होती. आता ‘ठाकरे २’ चित्रपट येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

आणखी वाचा – शहरातलं घर सोडून महाबळेश्वरमध्ये राहतेय सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, फोटो शेअर करत सांगितलं कसं जगतेय आयुष्य?

नवाजुद्दीनने चित्रपटात बाळासाहेबांची हुबेहूब भूमिका साकारली होती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या ‘मटा कॅफे’ कार्यक्रमात संजय राऊत यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांना ‘ठाकरे २’ चित्रपट येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला.

आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”

काय म्हणाले संजय राऊत?
“‘ठाकरे २’ही चित्रपट येईल. जर एकनाथ शिंदे यांच्यावर चित्रपट येऊ शकतो तर…कारण ‘धर्मवीर’ हा आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट नसून एकनाथ शिंदे यांचाच चित्रपट होता. हे नंतर कळालं.” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ठाकरे २’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार? या चित्रपटामध्ये कोण कोण कलाकार असणार? याबाबत तरी सध्या संजय राऊत यांनी बोलणं टाळलं आहे. ‘ठाकरे’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये काय नवीन पाहायला मिळणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.