अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही आतापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपट, वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिचं नाव मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे. नुकतीच तिने ‘मिरची मराठी’च्या यूट्यूब चॅनेलला भेट दिली. या मुलाखतीदरम्यान तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी, अभिनय क्षेत्रातील अनेक किस्से शेअर केले.

‘मिरची मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा संस्कृतीला विचारण्यात आलं की, तिला एकटीला चित्रपट बघायला जायला आवडतं का? यावर संस्कृती म्हणाली की, तिला एकटीला जायला अनेकदा आवडतं. चित्रपटगृह तिच्या घरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर असल्याने ती अनेकदा एकटीच जाते. परंतु, तिथे गेल्यावर कधीकधी तिला न आवडणारे अनुभव येतात याबद्दल संस्कृती बालगुडे म्हणाली, “जे लोक चित्रपटांच्या मध्ये बोलतात, ज्यांचे फोन वाजतात, जे व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट चेक करत असतात किंवा मोठमोठ्याने हसत असतात किंवा डायलॉग रीपिट करत असतात मला त्यांच्याविषयी शून्य आदर आहे. या संदर्भात माझी भांडणंही झाली आहेत. पण, चित्रपटगृहात मी खूप वेगळी असते. माझ्यातील खडूस कोणीतरी बाहेर येतं आणि मला हे सगळं अजिबात सहन नाही होतं.”

हेही वाचा… दिवसातून ३० गोळ्या अन् इंजेक्शन्स…, मौनी रॉय ‘या’ गंभीर आजाराने होती त्रस्त; म्हणाली, “मी ३ महिने अंथरुणाला खिळून…”

संस्कृती पुढे म्हणाली, “चित्रपटगृहात येणं, चित्रपट बघणं हे माझं काम आहे, हा माझा अभ्यास आहे. जिथे आपण सार्वजनिकपणे या गोष्टी नाही करायला पाहिजे, त्या तुम्ही का करताय? मला माहीत आहे, कधीकधी चुकून होतं माणसांकडून, पण आता आपण सगळे सूज्ञ झालो आहोत.”

“मला अजून एका गोष्टीचा राग येतो, ते म्हणजे राष्ट्रगीताच्या वेळेस जे लोक स्वस्थ उभे रहात नाही, त्यांच्याविषयी मला अजिबात आदर नाही आहे. दोन मिनिटांचंही राष्ट्रगीत नाही आहे. तुम्ही कदाचित शाळा झाल्यानंतर २२ किंवा १२ वर्षांनी ते राष्ट्रगीत म्हणता”, असंही संस्कृती म्हणाली.

हेही वाचा… “त्याच्याकडे जेवढे पैसे होते ते…”, मृण्मयी देशपांडेने सांगितला सुनील बर्वेंबरोबरचा कुंकू मालिकेतील ‘तो’ अनुभव

संस्कृती किस्सा सांगत म्हणाली, “कालच एक किस्सा झाला; काल मी आणि माझी मैत्रीण एका चित्रपटगृहात गेलो होतो. ती एक हॉरर फिल्म होती आणि आम्ही चित्रपटगृहात फक्त दोघीच होतो. आम्हाला असं वाटलं की, कोणीच आलं नाही आहे. आम्ही या हॉरर फिल्मला दोघंच आहोत. तेव्हा राष्ट्रगीत सुरू होणार होतं आणि मी माझ्या मैत्रिणीला म्हणाली, आज मी ओरडून राष्ट्रगीत म्हणणार आहे आणि ती म्हणाली, हो चालेल. त्यामुळे काल आम्ही ओरडून मनसोक्त राष्ट्रगीत गायलं. जेव्हा मी शाळेच्या संमेलनामध्ये राष्ट्रगीत म्हणायचे, तसं मी काल गायलं आणि मला जे भारी वाटलं ना; कारण मला असं वाटतं की ते दोन मिनिट आपण आपल्या देशासाठी तेवढं तर करू शकतोच.”

हेही वाचा… “लवकर लग्न करा”, भूषण प्रधान व अनुषा दांडेकरच्या ‘त्या’ फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संस्कृतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, संस्कृतीचा ‘८ दोन ७५’ चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित झाला. ‘घे डबल’ या चित्रपटातदेखील संसकृती झळकणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.