‘जय मल्हार’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’सारख्या मालिका ‘शेर शिवराज’, ‘गर्लफ्रेंड’ यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पडणारी अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर सध्या चर्चेत आहे. लवकरच तिचा ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला, ज्यात तिने आपल्या भूमिकेविषयी आणि सह कलाकार ओंकार भोजनेबद्दल भाष्य केलं आहे.

ईशा केसकर सोशल मीडियावर कायमच सक्रीय असत, तिच्या बोल्डनेसमुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेते, या चित्रपटातल्या तिच्या भूमिकेविषयी ती म्हणाली की, “माझ्यासाठी ही भूमिका चॅलेजिंग होती कारण बानू असो किंवा शनाया असो या भूमिकांसाठी काही विशिष्ठ अशी मागणी नव्हती, मात्र या भूमिकेत मला प्रत्येक सीनमध्ये सुंदर दिसायचं होत, पुढे ती ओंकार विषयी बोलताना असं म्हणाली की, पहिल्या भेटीत वाटलं ओंकार हसवणारा असेल जसा तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रेत’ होता,मात्र तसा तो अजिबात नाहीये तो खूप शांत आणि लाजाळू आहे, या चित्रपटाने मला बाकी काही नाही दिल तरी चालेल मात्र ओंकारसारखा सह कलाकार दिला आहे. तो कायमच अभिनय करण्यासाठी तयारीत असतो.” अशी प्रतिक्रिया तिने दिली.

“तिच्याबरोबर माझं नाव….” सपना चौधरीशी होणार्‍या तुलनेवर गौतमी पाटीलचे स्पष्टीकरण

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता म्हणजे काही दिवसांपूर्वीच ओंकारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला. त्यानंतर तो ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात दिसला. या चित्रपटात ओंकार आणि ईशाची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ईशा केसकर (@ishagramss)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. तसेच या चित्रपटाची कथा ग्रामीण भागावर आधारित असल्याचं टीझर पाहिल्यानंतर लक्षात येतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन सिंधु विजय सुपेकर यांनी केलं आहे. २० जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.