कामानिमित्ताने आज अनेक जण घराबाहेर असतात. आज भारतातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशात स्थायिक झाले आहेत. मात्र आपल्या संस्कृतीला सणाला विसरलेले नाहीत. परदेशात राहून ते आपले सण समारंभ साजरे करत असतात. यात आता चित्रपटसृष्टीतील कलाकारदेखील मागे नाहीत. कलाकार मंडळी कायमच कामाच्या निमित्ताने ठिकठिकाणी फिरत असतात. मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मूळचा पुण्याचा सध्या मुंबईत स्थायिक झालेला समीर सध्या गुजरातमध्ये एका चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. चित्रीकरणातून वेळ काढत त्याने पोस्ट शेअर केली आहे त्यात तो असं म्हणाला आहे ‘अहमदाबादहून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!यशाच्या शांतीच्या, आरोग्यसंपन्नतेच्या आणि समृद्धीच्या लाखो दिव्यांनी सगळ्यांचं आयुष्य उजळून जावो’! अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समीरने आपल्या करियरची सुरवात एकांकिका, नाटकांपासून केली आहे. ‘आनंदी गोपाळ’, ‘टाइमप्लीज’, ‘डबल सीट’, ‘धुरळा’सारखे चित्रपट त्याने दिग्दर्शित केले आहेत. ‘समांतर २’ या वेब सीरीज चे दिग्दर्शन केले आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या माध्यमातून समीर हे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. चित्रपटाच्या इतर कलाकारांबद्दल तूर्तास काहीच माहिती मिळाली नसून हा चित्रपट २९ जून २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.