मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सायली संजीव होय. ती तिच्या अभिनयाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अभ्यास करतानाचा फोटो टाकले आहेत. ती पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेत असल्याचं तिने म्हटलं आहे.

“मी त्यांना जग बघायला पाठवतोय…”, सिद्धार्थ जाधवच्या आई-वडिलांची परदेशवारी; नेटकरी म्हणाले, “सिद्धू तुझा…”

सायली राज्यशास्त्र या विषयात मास्टर्स करत आहेत. तिने ‘शिकणे कधीही थांबवू नका’ असं कॅप्शन देत फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती अभ्यास करताना दिसत आहे. तिने या फोटोंना #examtime #exams #masters #politicalscience असे हॅशटॅग्स दिले आहेत. ऋतुजा बागवेने यावर अभ्यासू मुलगी अशी कमेंट केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सायलीचे चाहतेही तिच्या पोस्टवर कमेंट्स करत आहेत. अनेकांनी तिला परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान सायली संजीवने ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर तिने ‘बस्ता’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘दाह’, ‘झिम्मा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. ती सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते.