सध्या मराठीमध्ये नवनवीन विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामध्ये विनोदी तसेच ऐतिहासिक चित्रपटांचाही समावेश आहे. आता आणखी एक मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच नवीन विक्रम रचला आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या ‘पल्याड’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर खरंच मनाला भिडणारा आहे.

‘पल्याड’ चित्रपटाची गोव्यात होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियासाठी (इफ्फी) निवड करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. याच ऐनमोक्यावर ‘पल्याड’चा ट्रेलर लाँच करण्यात आला. ‘मुक्ती देईन म्हणजे काय रं आबा?’ या लहान मुलाच्या संवादानेच चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. पाप-पुण्याच्या फेऱ्यातून मुक्त करणं म्हणजे मुक्ती असा अर्थ त्या मुलाला सांगितला जातो.

शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुलाची कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. शिकण्याची इच्छा असलेला मुलगा आणि त्याला शिकून मोठं झाल्याचं स्वप्न पाहणारी त्याची आई याभोवती चित्रपटाची कथा फिरते. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

आणखी वाचा – Video : ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या ‘त्या’ सीनदरम्यान एक चूक घडली अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जवळपास १४ चित्रपट महोत्सवांमध्ये ‘पल्याड’ची निवड करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात २५ दिवसांमध्ये या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं. शैलेश दुपारे दिग्दर्शित चित्रपटात शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, बाल कलाकार रुचित निनावे, देवेंद्र दोडके आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहेत. येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.